मराठी बातम्या /बातम्या /Viral /

स्वतःला गरोदर समजत होती महिला; रुग्णालयात जाताच झाला धक्कादायक खुलासा

स्वतःला गरोदर समजत होती महिला; रुग्णालयात जाताच झाला धक्कादायक खुलासा

मिया स्वतःला फिट समजत होती. तिनं वर्षभरात भरपूर वजन कमी केलं होतं. ती आपल्या स्लिम लुकमुळे चांगलीच आनंदात होती.

मिया स्वतःला फिट समजत होती. तिनं वर्षभरात भरपूर वजन कमी केलं होतं. ती आपल्या स्लिम लुकमुळे चांगलीच आनंदात होती.

मिया स्वतःला फिट समजत होती. तिनं वर्षभरात भरपूर वजन कमी केलं होतं. ती आपल्या स्लिम लुकमुळे चांगलीच आनंदात होती.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 28 सप्टेंबर : प्रेग्नंसी (Pregnancy) हा कोणत्याही महिलेसाठी अत्यंत खास काळ असतो. या काळात ती भरपूर स्वप्न पाहते. प्रेग्नंसी फिट आणि हेल्दी असेल तर हा काळ आणखीच खास बनतो. 25 वर्षाच्या मिया मॅकिन (Mia Mackin) हिच्यासोबतही असंच होत होतं. मात्र, जोपर्यंत तिला हिला समजलं नाही की तिची हीच प्रेग्नंसी तिच्यासाठी जीवघेणी ठरू शकते, तोपर्यंतच.

लाईफस्टाईल ब्लॉगर मिया स्वतःला फिट समजत होती. तिनं वर्षभरात भरपूर वजन कमी केलं होतं. ती आपल्या स्लिम लुकमुळे चांगलीच आनंदात होती. तिला या गोष्टीची भनकही नव्हती की अचानक घटलेलं तिचं हे वजन (Sudden Weight Loss) खरंतर तिच्यासाठी चांगलं नाही. या दरम्यान तिला वेगळंच काहीतरी जाणवू लागलं. मियाला असं वाटलं की हे तिच्या गरोदरपणामुळे होत आहे. मात्र, आपल्या आयुष्यातील सर्वात भयंकर सत्य तिला तेव्हा समजलं जेव्हा ती ऑक्टोबर २०१९ ला हेल्थ चेकअपसाठी (Health Check Up) रुग्णालयात पोहोचली.

माकडानं घेतला अपमानाचा बदला; रिक्षाचालकाला धडा शिकवण्यासाठी केला 22 km प्रवास

द सनच्या वृत्तानुसार, मियाला सुरुवातीपासून वजन वाढणे आणि थायरॉईडचा त्रास (Weight and Thyroid) होता. अशात जेव्हा तिचं वजन आपोआप कमी होऊ लागलं तेव्हा ती आनंदी झाली. तिच्या पोटात दुखू लागलं आणि थकवाही जाणवू लागल्यानं आपण प्रेग्नंट असल्याचं तिला वाटू लागलं. मात्र, डॉक्टरांनी तिला तिचे हार्टबीट वाढल्याचं सांगितलं आणि हेदेखील स्पष्ट केलं की ती गरोदर नाही. तिला रुग्णालयातच काही टेस्ट करण्यासाठी थांबवलं गेलं.

नवरीसाठी स्टेजरवरच केलं हे काम; नवरदेवानं जिंकली सगळ्यांची मनं, पाहा खास Video

मियाच्या एक्स रे रिपोर्टमध्ये तिची खराब तब्येत आणि घटलेलं वजन याचं सत्य समोर आणलं. डॉक्टरांनी मियाला सांगितलं, की तिच्या छातीत ट्यूमर आहे. जो कॅन्सरही असू शकतो. ही गोष्ट समजताच मिया सदम्यात गेली. मात्र, सत्य समजलं याचा तिला आनंद होता. तिला Hodgkin lymphoma नावाचा दुर्मिळ कॅन्सर होता. डिसेंबर २०१९ मध्ये तिला थायरॉईड कॅन्सरबद्दलही समजलं. जो तिचा गळा खराब करत होता. मात्र, यावर्षी २०२१ मध्ये ऑपरेशन करून तो बरा करण्यात आला. किमोथेरेपीमुळे तिचा कॅन्सरही बरा झाला आहे. मात्र, आता तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

First published:

Tags: Cancer, Pregnancy, Pregnant woman