चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मदत मागतेय ही व्यक्ती, काय आहे प्रकार?

या VIDEO मध्ये बिचारा पत्नी स्वत:च्या पत्नीला घाबरुन जोरजोरात पळताना दिसत आहे.

या VIDEO मध्ये बिचारा पत्नी स्वत:च्या पत्नीला घाबरुन जोरजोरात पळताना दिसत आहे.

 • Share this:
  सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ भावनिक असतात, जे पाहून डोळ्यांत अश्रू उभे राहतात. तर असे काही व्हिडिओ असतात जे पाहून हसू आवरत नाही. नवरा-बायकोमधील नातंही असं आंबट-गोड तर कधी कडू असतं. दोघांमध्ये भांडणं हा तसा काही नवा विषय नाही. मात्र या भांडणातून असे काही प्रसंग उभे राहतात ते पाहून हसून हसून पोट दुखू लागतं. अशाच एका व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने पत्नीच्या भीतीने धूम ठोकली आहे. इंटरनेटवर पती-पत्नीमधील वादाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथे एक बिचारा पती आपल्या पत्नीच्या भीतीने पळत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरुन पळत आहे. तो रडत रडत म्हणतोय की, प्लीज मला वाचवा..माझी पत्नी माझा जीव घेईल. तो म्हणतो की, पत्नीला घाबरुन मी आग्रामधून पळून आलो आहे. हा व्हिडिओ इथेच संपत नाही. तर खरं ट्वीट यापुढे आहे. हे ही वाचा-बॉयफ्रेंडच्या पेंटिंग्ससमोर बसून श्रुती हसनने केलं Bold Photoshoot
  View this post on Instagram

  A post shared by Vipul Mittal (@vittyvipul)

  ही व्यक्ती पुढे म्हणते की, काल माझ्या पत्नीने मला विचारलं की, मी तिच्यावर किती प्रेम करतो. त्यावर मी म्हटलं की, हृदय चिरून बघ...(दिल चीर के देख लो) आता तर ती माझं हृदय कापून बघण्यासाठी माझ्या मागे लागली आहे. हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर vittyvipul नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 13 हजारहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. लोक हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करीत आहेत व अनेक प्रतिक्रियाही देत आहेत.

  Published by:Meenal Gangurde
  First published: