मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरेच्चा! नवरदेवाला सोडून पळत सुटली नवरी; मग काय झालं एकदा पाहाच..VIDEO

अरेच्चा! नवरदेवाला सोडून पळत सुटली नवरी; मग काय झालं एकदा पाहाच..VIDEO

व्हायरल

व्हायरल

लग्न म्हटलं की धमाल मस्ती ही आलीच. लग्नांमध्ये अनेक मजेशीर, विचित्र, घटना पहायला मिळतात. कधी कधी भयानक गोष्टीही घडतात ज्यामुळे लग्नामध्ये गोंधल उडतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 12 मार्च : लग्न म्हटलं की धमाल मस्ती ही आलीच. लग्नांमध्ये अनेक मजेशीर, विचित्र, घटना पहायला मिळतात. कधी कधी भयानक गोष्टीही घडतात ज्यामुळे लग्नामध्ये गोंधल उडतो. सोशल मीडियावर अशा वेगवेगळ्या घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एक मजेशीर व्हिडीओ समोर आला असून लग्न समारंभात एक हशा पहायला मिळाला.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू घरात प्रवेश करताना कशी पुढे पळत आहे, तर वर तिच्या चार पावले मागे राहतो. मग लोकांच्या सांगण्यावरून वधू मागे वळून पाहते. तेव्हा तिला कळते की वराला तिने खरोखरच मागे सोडले आहे. यानंतर तेथे उपस्थित लोक आणि महिलांमध्ये एकच हशा पिकतो. तसेच या घटनेनंतर वधू-वरांनाही हसू आवरता येत नाही. मग वधू स्वतः वराला हात धरून बोलावते.

View this post on Instagram

A post shared by Indian Wedding (@wedus.in)

वधू वरांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ Indian Wedding या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून आला. व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंटदेखील येत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 6 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर लग्नातील हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक वेगवेगळ्या घटना लग्नामध्ये होत असतात. नेटकरीही अशी व्हिडीओंना पसंती दर्शवतात. लग्नांमध्ये विविध विधी असतात, ज्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. आपण विचारही करु शकत नाही असे व्हिडीओदेखील समोर येतात.

First published:
top videos

    Tags: Top trending, Videos viral, Viral news, Wedding video