मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हत्तीच्या त्रासाला गावकरी वैतागले; हत्या करून अख्ख्या गावातील लोकांना खाऊ घातलं मांस

हत्तीच्या त्रासाला गावकरी वैतागले; हत्या करून अख्ख्या गावातील लोकांना खाऊ घातलं मांस

अनेकदा जंगली प्राणी वाट चुकतात आणि माणसांनी भरलेल्या गावात शिरतात. मात्र याचा असा परिणाम यापूर्वी कधीच पाहिला नसेल.

अनेकदा जंगली प्राणी वाट चुकतात आणि माणसांनी भरलेल्या गावात शिरतात. मात्र याचा असा परिणाम यापूर्वी कधीच पाहिला नसेल.

अनेकदा जंगली प्राणी वाट चुकतात आणि माणसांनी भरलेल्या गावात शिरतात. मात्र याचा असा परिणाम यापूर्वी कधीच पाहिला नसेल.

  • Published by:  Meenal Gangurde

आफ्रिकेच्या पश्चिमेकडील एका हत्तीने घातलेल्या गोंधळामुळे गावकरी इतके वैतागले की, हत्तीला मारून टाकलं आणि गावातील लोकांना खाऊ घातलं. हा हत्ती ऑफ्रिकेतील पश्चिम भागात बेनिनच्या नॅशनल वाइल्ड लाइफ पार्कातून पळाला होता आणि नॅशनल पार्कातून पळाल्यानंतर कांदी नावाच्या एका भागात फिरत होता. हा हत्ती मार्च महिन्यात याच भागातील जवळपासच्या गावात फिरत असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या हत्तीने सर्वात आधी एका महिलेला आपला निशाणा बनवला. त्यानंतर त्याने गावातील अनेकांना जखमी केलं होतं. यानंतर स्थानिक चिडले होते. या घटनेनंतर अनेकांनी हत्तीला मारण्याचा किंवा त्याला नॅशनल पार्कमध्ये पाठविण्याची अधिकाऱ्यांकडे विनंती केली होती. मात्र त्यांच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. एका महिन्यानंतर हत्तीने सोनसोरो नावाच्या भागातील दोघांची हत्या केली. यानंतर प्रशासन गंभीर झालं आणि हत्तीचा शोध सुरू केला.

हे ही वाचा-बापरे! अंगावर येऊन बसली 101 किलोची पत्नी, पतीचा जागीच मृत्यू

27 एप्रिल रोजी रेंजर्सने सांगितलं की, हत्तीला मारण्यात आलं आहे. यानंतर रेंजर्सच्या कर्मचाऱ्यांनी या हत्तीची चिरफाड केली आणि त्याचं मांस स्थानिकांमध्ये वाटलं. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इच्छा नसतानाही रेंजर्संना या हत्तीला मारावं लागलं, हा हत्ती स्थानिकांसाठी धोका ठरला होता. फ्रान्स 24 सोबत बातचीतमध्ये फॉरेस्ट्रीक कॅप्शन डेविड आयेगनने सांगितलं की, हत्तीला अलीबोरी नदीजवळ मारण्यात आलं होतं. रेजर्स काम पर्यावरणाची रक्षा करण्याचं आहे, परंतु गावकऱ्यांच्या दबावामुळे हे पाऊल उचलावं लागलं. हत्ती खूप हिंसक झाला होता, त्यामुळे त्याला पार्कमध्ये घेऊन जाण्यात अडचणी येत होत्या.

First published:

Tags: Death, Elephant