झारखंड, 18 ऑक्टोबर : सांप विशेष करून अजगराचं नाव ऐकताच आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. मात्र आज आपण अशा अजगराबद्दल (Python) बोलणार आहोत, ज्याला रेस्क्यू करण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. हो हे खरं आहे. (jharkhand News) कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही.
झारखंडमधील महाकाय अजगराला उचलण्यासाठी माणसं बोलवण्यात आली नाही तर थेट जेसीबी बोलविण्यात आली. ही घटना धनबाद जिल्ह्यातील सिंदरी भागातील आहे. येथे एक महाकाय व विशाल आणि वजनदार अजगर सापडला होता. त्याला रेस्क्यू करण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (The villagers called JCB to pick up the giant Python see VIDEO )
हे ही वाचा-भररस्त्यात तरुणीला जबरदस्तीने काढायला लावला बुरखा; VIDEO VIRAL झाल्यानंतर...
धनबाद जिल्ह्यातील सिंदरी येथे विशालकाय, वजनदार अजगर सापडल्याने खूप चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील सिंदरी स्थित एफसीआय परिसरात विशालकाय अजगर साप आढळला. याची सूचना प्रबंधनाच्या कर्मचाऱ्यांद्वारे देण्यात आली होती. अजगराची माहिती मिळताच घटनास्थळी जेसीबी पाठविण्यात आला आणि जेसीबी मशीनच्या मदतीने अजगराला उचलण्यात आलं.
जेव्हा जेसीबीने अजगराला उचललं तेव्हा अजगराचं ते विशालकाय रूप पाहून लोक हैराण झाले. इतक्या भल्या मोठ्या अजगराला पाहून लोकांची बोलती बंद झाली. या अजगराचं वजन काही क्विंटलमध्ये असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jharkhand, Python, Python snake, Shocking viral video