OMG! विषारी सापाला या पक्षाने एका दमात गिळलं; Video पाहून अंगावर काटा उभा राहिल

OMG! विषारी सापाला या पक्षाने एका दमात गिळलं; Video पाहून अंगावर काटा उभा राहिल

हे पक्षी खूप सहजपणे विषारी सापांची शिकारही करतात आणि गिळतातही. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : सोशल मीडियामधील एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोडरनर  (Cuckoos) हा विषारी सापाची (Venomous Snake) शिकार करताना दिसत आहे. रोडरोनर एका कोकिळासारखा पक्षी असून जो सामान्यत: रस्त्याच्या कडेला चालणे पसंत करतो. हा पक्षी आकाराने लहान असतो. मात्र तो अतिशय हुशारीने विषारी सापांची शिकार करू शकतो. हे पक्षी खूप सहजपणे विषारी सापांची शिकारही करतात आणि गिळतातही.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रोडरनर एका विषारी सापाची (Roadrunners eat snakes) अत्यंत हुशारीने शिकार करताना दिसत आहे. इतकच नाही तर जेव्हा साप मरतो तेव्हा तो त्याला गिळूनही घेतो. हा भयंकर व्हिडीओ ट्विटरवर नेचर इज स्केरी  (Nature is Scary) यांनी शेअर केला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. हा व्हिडीओ 3 डिसेंबर रोजी नेचर इज स्केरीने शेअर केला होता.

हा व्हिडीओ आतापर्यंत 33 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओला आतापर्यंत 3400 लाईक्स आणि 531 रिट्वीट मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका 'रोडरनर साप खातो हे खूप मोठे आहेत.' व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की एक साप फणा काढून बसला आहे. तेव्हाच रोडरनर तेथे येतो आणि दोघांमध्ये मारमारी सुरू होते. यामध्ये रोडरनर हे जिंकतो आणि सापाचा यामध्ये मृत्यू होतो. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, सापाचा फणा आपल्या चोचीने पकडतो. साप मरत नाही तोपर्यंत हा रोडरनर त्याला पकडून ठेवतो. साप मेल्यानंतर पक्षी त्याला गिळून घेतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळत आहे. अनेकजण हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत.

सांगितले जाते की कोकिळेच्या जातीतील असलेला हा पक्षी अमेरिकेच्या उत्तरेकडील दक्षिण व पश्चिमी भागातील आणि मेक्सिकोमध्ये सापडतो. हा पक्षी वाळवंट, गवताचं मैदान, स्क्रबलँड्स आणि वुडलँड्समध्ये राहणे पसंत करतो. याशिवाय रोडरनर शहरी भागांमध्येही राहतो. सर्वसाधारणपणे हा पक्षी रस्त्याच्या किनाऱ्यावरुन चालणे पसंत करतो. त्यामुळे याचं नाव रोडरनर्स ठेवण्यात आलं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: December 12, 2020, 9:52 PM IST

ताज्या बातम्या