मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बुलेटमध्ये पेट्रोल कमी म्हणून वाहतूक पोलिसांनी कापलं चलन; बायकर Shocked!

बुलेटमध्ये पेट्रोल कमी म्हणून वाहतूक पोलिसांनी कापलं चलन; बायकर Shocked!

सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
तिरुवनंतपुरम, 28 जुलै : गाडीचं चलन देताना कोणत्याही व्यक्तीला त्रास होतो. या सर्व कारवाईपासून बचाव करण्यासाठी लोक आवश्यक कागदपत्र आपल्या सोबत ठेवतात. मात्र केरळमधील एका व्यक्तीला ट्रॅफिक पोलिसांनी अशा कारणासाठी चलन कापलं की, अनेकांना धक्काच बसला. त्या तरुणाच्या बाईकमध्ये कमी पेट्रोल होतं. त्यामुळे त्यांना थेट दंडच भरावा लागला. बाईकमध्ये पुरेसं पेट्रोल नसल्यामुळे त्या तरुणाला 250 रुपयांचं चलन भरावं लागलं. ज्यानंतर तरुणाने चलनाचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. जो सध्या खूप व्हायरल होत आहे. या तरुणाचं नाव बेसिल श्याम असल्याचं समोर आलं आहे. घटनेच्या वेळी तो आपल्या बुलेटने कामावर जात होता. मात्र वन-वेमध्ये बाईक पकडल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याचं चलन कापलं. मात्र जेव्हा ऑफिसमध्ये गेल्यावर त्याने चलनाची रिसिप्ट पाहिली तर त्याला धक्काच बसला. त्यामध्ये पुरेसं पेट्रोल नसल्याने गाडी चालवण्याचा आरोप केला आहे. यानंतर तरुणाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. फेसबुक पोस्टमधील कॅप्शननुसार, चलानचा फोटो व्हायरल झाल्यानंतर बेसिल श्याम याला मोटर वाहन विभागाकडून एका अधिकाऱ्याचा फोन आला. अधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं की, अशी कारवाई कोणत्या प्रसंगात होते. मात्र नियम दुचाकी आणि खासगी वाहनांवर लागू नसते. तर केवळ सार्वजनिक परिवहनवर लागू असते. Mashable च्या रिपोर्टनुसार, केरळ परिवहन कायद्यानुसार, जर कमर्शियल वाहन उदा. बस, कार, वॅन आणि ऑटो यातील पेट्रोल प्रवाशांना इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्याआधी संपलं तर ड्रायव्हल किंवा मालकाला 250 रुपयांचा दंड भरावा लागतो.

First published:

Tags: Kerala, Traffic police

पुढील बातम्या