Home /News /viral /

वाघाने रस्त्यावरच ठोकली बैठक; एका तासापर्यंत नागरिकांनीही रोखून धरला श्वास; पाहा VIDEO

वाघाने रस्त्यावरच ठोकली बैठक; एका तासापर्यंत नागरिकांनीही रोखून धरला श्वास; पाहा VIDEO

वाघ आणि मानव यांच्या मध्ये आधी सुद्धा अनेकदा भेटी आणि संघर्ष झाले आहेत. कधी वाघ भारी पडले आहेत तर कधी मनुष्य, परंतु दोन्ही ही जीव एक-दुसऱ्याच्या वाटेला कमीच जातात.

    उत्तराखंड, 23 नोव्हेंबर : लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथील दुधवा टायगर रिझर्व्हमधील बफर झोनमध्ये रविवारी पहाटे अचानक एक वाघ रस्त्यावर आला. यामुळे आसपासच्या भागात खळबळ उडाली. बफर ऑफ मलानी रेंजच्या कुक्रा भीरा रस्त्यावर ही घटना घडली. आज पहाटे सहा वाजता रस्त्यावर जंगलातून एक वाघ बाहेर आला. वाघाने सुमारे एक तास रस्तावर बैठक मारली. यावेळी  वाघ रस्त्यावर चालू लागला आणि तो आपल्याच मस्तीत होता. या वेळी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. बर्‍याच काळानंतर वाघ स्वत:च रस्त्यावरुन उतरून जंगलात गेला.  त्यानंतर, थांबलेल्या गाड्यांतील प्रवाशांनी आणि तिथल्या रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वाहने रस्त्यावर सहजतेने धावू लागली. या रस्त्यावर वाघाच्या आगमनामुळे तेथून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुधवा टायगर रिझर्व्हमधून वाघ अनेकदा रस्त्यावर येतात. बफर झोनचे डीएफओ अनिल पटेल सांगतात की, या दिवसात भिरा कुक्रा रोड परिसरात वाघ आहेत. लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. लोकांना येथून जाताना किंवा जंगली रस्त्यावरून जाताना एकत्र जमून बाहेर पडण्यास सांगितले आहे. वन विभागाची टीम या वाघावर सातत्याने नजर ठेवत आहे. ते म्हणाले की, आमची टीम वन्य प्राणी आणि मानव संघर्ष रोखण्यासाठी वाघावर सातत्याने नजर ठेवत आहे. हे ही वाचा-भीषण! तरुणाने ब्लेडने स्वत:चच गुप्तांग कापलं; कारण ऐकून परिसरात उडाली खळबळ उत्तराखंडच्या डोंगराळ राज्यातील एक व्हिडिओ हल्लीच खूप व्हायरल होत होता. व्हायरल व्हिडिओमध्ये एक बिबट्या मानवी वस्तीत फिरताना दिसला. विशेष गोष्ट म्हणजे व्हिडिओमध्ये बिबट्या भिंतीवर चालत असताना एका कॅम्पसमध्ये घुसताना दिसला आहे. त्याच वेळी, व्हिडिओ बनविणार्‍या काही लोकांचा आवाज देखील ऐकू येऊ शकतो. व्हिडिओ तयार करणारेही घाबरले असे दिसते आहे की काही लोकांनी हा व्हिडिओ कारच्या आतून बनविला आहे. यावेळी, एका तरूणाने आवाज दिला की भाऊ गाडीच्या काचा पूर्णपणे उघडू नका, नाही तर आपल्यावर हल्ला होऊ शकतो.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या