मराठी बातम्या /बातम्या /Viral /

माकडांचा वर्ग झाला सुरू, तरुणाने शिकवलं अ..आ; मजेशीर Viral Video

माकडांचा वर्ग झाला सुरू, तरुणाने शिकवलं अ..आ; मजेशीर Viral Video

अभ्यास करताना माकडं कसे दिसतात, एकदा पाहाच...

अभ्यास करताना माकडं कसे दिसतात, एकदा पाहाच...

अभ्यास करताना माकडं कसे दिसतात, एकदा पाहाच...

  • Published by:  Meenal Gangurde
सोशल मीडियावर (Viral Video On Social Media) प्राण्यांसंदर्भातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात विनोदी आणि क्यूट रिअॅक्शनच्या व्हिडीओंचा समावेश असतो. ज्यात सर्वाधिक माकडांचा व्हिडीओ पसंत केला जातो. माकडं कायम विचित्र हालचाली करतात आणि ज्यातून लोक खूप हसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात माकडं अ..आ शिकताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण दोन माकडांना शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. तो केळ्याचं आमिष दाखवून माकडांना शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी तरुण एक वही आणि मार्कर घेऊन माकडांना अ, आ ही बाराखडी शिकवत आहे. मात्र माकडं शिकतच नाही. यानंतर तो माकडांना केळं देतो आणि लिहियाला सांगतो. माकड एकदा मार्कर हातात घेतो. मात्र त्याचा वास घेऊन फेकून देतो. यानंतर माकडं त्याची बँग चाचपण्याचा प्रयत्न करतात. लोकांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. यासोबतच हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ The Khurapati Indian नावाच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. लोक हा व्हिडीओ खूप पसंत करीत आहेत.

First published:

Tags: Viral video on social media

पुढील बातम्या