मुंबई, 22 सप्टेंबर : कोळ्याला खाणारे बरेच प्राणी पाहिले आहेत. अगदी मांजरापासून पालीपर्यंत कोळ्याला सगळे खातात पण कोळ्यानं कधी इतर पक्ष्या-प्राण्यांचा खाल्ल्याचं ऐकलं का? अहो तुमचा पण विश्वास बसणार पण ही घटना घरी घडली आहे. एका कोळ्यानं चिमणीला खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हा कोळी एका लाडकाच्या बीमवर बसला आहे. त्यानं आपलं सावज आधी शांतपणे पक्क केलं आणि मग चिमणीची शिकार केली. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की हा कोळी खूप मोठा आहे. काळ्या रंगाच्या कोळ्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ रेडिट युझरनं शेअर केला आहे. या युझरनं या कोळ्याला गोलियथ बर्ड ईटर असं शेअर करताना म्हटलं आहे. जे पूर्णपणे चुकीचं आहे. याउलट गोलियथ बर्ड ईटर हा जगातील सर्वात मोठा कोळी मानला जातो. पण हा तो कोळी नाही असाही देवा केला आहे.
An Avicularia munching on a bird. pic.twitter.com/IdjQyWMxFZ
— The Dark Side Of Nature (@Darksidevid) September 1, 2020
हे वाचा-अजून काय पाहाचयं बाकी आहे? सिगरेटचा धूर उडवताना दिसला चक्क खेकडा, VIDEO VIRAL
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर युझर्समध्ये खळबळ उडाली आहे. कोळ्यानं चिमणीला खाल्लं ही कल्पना केली तरी थोड विचित्र वाटतं तिथे हा प्रत्यक्षात साक्षात्कार समोर आल्यानं काहीसा युझर्समध्येही गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. 363 K लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून दीड हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. अनेक युझर्सनी हा व्हिडीओ खरा नाही एडिट केला असल्याचा दावाही केला आहे. तर एका युझरनं हा व्हिडीओ खरा नाही अशी आशा करतो अशी कमेंट देखील केली आहे.