Home /News /viral /

लग्न झालेल्या महिलेने मित्रासोबत घालवली रात्र, गर्भवती राहताच समोर आलं धक्कादायक सत्य

लग्न झालेल्या महिलेने मित्रासोबत घालवली रात्र, गर्भवती राहताच समोर आलं धक्कादायक सत्य

कधीकधी अजाणतेपणामुळे झालेल्या एका चुकीचे (Mistake) गंभीर परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. अशा घटनेमुळे माणसाचं आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकतं.

    मुंबई, 25 मे-   कधीकधी अजाणतेपणामुळे झालेल्या एका चुकीचे (Mistake) गंभीर परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. अशा घटनेमुळे माणसाचं आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकतं. तसंच भावनेच्या भरात किंवा दारूच्या नशेत केलेल्या एखाद्या कृत्यामुळेही पश्चातापाची वेळ येऊ शकते. असाच काहीसा प्रकार एका महिलेसबोत घडलाय. दारूच्या नशेत या महिलेनं मित्रासोबत एका रात्रीसाठी शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले आणि ती गर्भवती झाली. आता तिने काय करावं? असा भलामोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिलाय. ब्रिटनमधील या महिलेनं सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आणि लोकांकडून सल्ला मागितला आहे. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. तर झालं असं की मित्रासोबत ‘वन नाईट स्टँड’ (One Night Stand) करणं या महिलेला खूप महागात पडलंय. लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे ती गर्भवती झाली आणि तिने पुढे काय करावं हे तिला कळत नाहीये. महत्वाचं म्हणजे ही महिला विवाहित असून, तिला दोन मुलं आहेत. या महिलेनं सोशल मीडियावर (Social Media) म्हटलंय की, तिने कोणत्याही प्रोटेक्शनशिवाय तिच्या मित्रासोबत सेक्स केलं, त्यानंतर ती गर्भवती झाली. ती महिला स्वतः दोन मुलांची आई आहे आणि तिला नंतर समजलं की तिने ज्या व्यक्तीसोबत सेक्स केलं तोदेखील दोन मुलांचा बाप आहे आणि रिलेशनशिपमध्ये आहे. प्रेग्नन्सीबद्दल कळल्याबद्दल ही महिला गोंधळली आहे. ती प्रेग्नंट आहे हे तिने त्या मित्राला सांगावं की, अबॉर्शन करावं, असा प्रश्न तिला पडलाय आणि याबाबतच तिने सोशल मीडियावर सल्ला विचारला आहे. महिलेची ही परिस्थिती वाचल्यावर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या. काहींनी तिला त्या मित्राला तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगण्याचा सल्ला दिलाय. ‘तू अबॉर्शन करणार असशील किंवा बाळाला जन्म देणार असशील, तरी तू त्या मित्राला (जो त्या बाळाचा बाप आहे त्याला) सांगायला हवं’ असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर काही म्हणाले, ‘सर्वांत आधी तू ठरव की तुला ते बाळ हवंय की नको. आधी निर्णय घेतल्यानंतरच तू त्याला सांगायला हवं.’ ती व्यक्ती फक्त माझा चांगला मित्र आहे. त्यालाही एक गर्लफ्रेंड असून त्या दोघांना दोन मुलं आहेत, असं महिनेनं सांगितलं. आपली चूक मान्य करत महिला म्हणाली, ‘आम्ही प्रोटेक्शन वापरायला हवं होतं. परंतु, दारूच्या नशेत आमच्याकडून चूक झाली. मी दुसऱ्या दिवशी कॉन्‍ट्रासेप्टिव पिल (Contraceptive Pill) घेतली होती पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. माझ्यासोबत असं काही घडेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मला अबॉर्शन करावं, असं वाटतंय पण मी या गर्भातल्या बाळाबद्दल खूप भावनिक आहे,’ असंही तिने सांगितलं. ही महिला आणि तिच्या मित्राने दारूच्या नशेत केलेली एक चूक तिला चांगलीच महागात पडली आहे.
    First published:

    Tags: Pregnancy, Relationship, Viral news

    पुढील बातम्या