मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'मी टकला असेन, पण...', चाहत्यांना भावली 'रॉक'ची पोस्ट!

'मी टकला असेन, पण...', चाहत्यांना भावली 'रॉक'ची पोस्ट!

सुपरस्टार, कुस्तीपटू आणि बिझनेसमन असलेला ‘द रॉक’ (The Rock) म्हणून ओळखला जाणारा धिप्पाड, बलदंड शरीराचा ड्वेन जॉन्सन (Dwayne Johnson) अतिशय प्रेमळ पिता आहे.

मुंबई, 25 जानेवारी : सुपरस्टार, कुस्तीपटू आणि बिझनेसमन असलेला ‘द रॉक’ (The Rock) म्हणून ओळखला जाणारा धिप्पाड, बलदंड शरीराचा ड्वेन जॉन्सन (Dwayne Johnson) अतिशय प्रेमळ पिता आहे. तुम्ही त्याचे निस्सीम चाहते असाल आणि त्याला सोशल मीडियावर फॉलो करत असाल तर ही बाब तुम्हाला नक्कीच माहित असेल. ड्वेन नेहमीच आपले आणि आपल्या मुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. ड्वेननं अलीकडेच शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आपल्या दोन वर्षांच्या सर्वात धाकट्या मुलीचे टीयानाचे (Tiana) विस्कटलेले केस बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या फोटोखाली त्यानं लिहिलं आहे की, माझी ही सर्वात लहान दोन वर्षाची मुलगी अतिशय घाबरलेली दिसत आहे. तिचे गुंतलेले केस सोडवण्याचा प्रयत्न करताना तिला होणाऱ्या त्रासासाठी तिचा डॅड जबाबदार आहे. सगळी सहनशक्ती एकवटून, अगदी शांतपणे, केस सोडवण्याचे सगळे कौशल्य पणाला लावणारा डॅडी अर्थात मी. या पोस्टच्या शेवटी तो म्हणतो, मला टक्कल असेल, पण मला केसांविषयी एक दोन गोष्टी नक्कीच माहित आहेत. कारण आपल्यालाही भरपूर केस असावेत, अशी माझी इच्छा होती.
View this post on Instagram

A post shared by therock (@therock)

त्याची ही पोस्ट वाचून आणि फोटो बघून, चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. सिमोन, जस्मिन आणि टीयाना या तीन मुलींचा बाप असलेल्या ड्वेनने पूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, बाप बनणे ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि भविष्यात असेल. मला माझ्या मुलांना त्या सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत, ज्या मला वाटते मला मिळाल्या नाहीत. ड्वेननं डिसेंबरमध्ये इन्स्टाग्राम अकाऊंट वर एका फोटो शेअर केला होता, ज्यात तो हातात बार्बी डॉल घेऊन बसला आहे, आणि त्याची छोटी मुलगी टीया दुसऱ्या खेळण्यांबरोबर खेळण्यात गुंग होती. त्यानं या पोस्टमध्ये म्हटलं होतं, ‘डॅडी कम प्ले बार्बी विथ मी, मित्रांनो, तुमचा ख्रिसमस चांगला असेल अशी आशा आहे, असं ड्वॅन म्हणाला होता.
First published:

पुढील बातम्या