अरे व्वा! रोबोटनं केली कॅन्सग्रस्तावर शस्रक्रिया, 7 दिवसात रुग्ण झाला बरा

अरे व्वा! रोबोटनं केली कॅन्सग्रस्तावर शस्रक्रिया, 7 दिवसात रुग्ण झाला बरा

डॉक्टरांची टीम आणि रोबोटनं मिळून ही शस्रक्रिया 10 तासांत यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : कोरोनाच्या महासंकटात सर्वात जास्त देवासारखं वाचवणारे कोरोना वॉरियर्स आणि त्याव्यतिरिक्त इतर आजारातून बरं करणाऱ्या डॉक्टरांना आपण देवमाणूस म्हणतो. याच डॉक्टरांसोबत आता चालता बोलता रोबोट ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणार आहे. कोरोनाचा काळात अनेक रोबोट कोरोना रुग्णालयात पाहिले मात्र एका रोबोनं चक्क माणसावर शस्रक्रिया केल्याची माहिती मिळत आहे.

एका कॅन्सरग्रस्त रुग्णावर शस्रक्रिया करायची होती. यासाठी डॉक्टरांनी रोबोची मदत घेतली आहे. तीन वेगवेगळ्या टप्प्यात ही शस्रक्रिया करायची असल्यानं कमी वेळात होणं आवश्यक होतं. डॉक्टरांची टीम आणि रोबोटनं मिळून ही शस्रक्रिया 10 तासांत यशस्वीपणे पूर्ण केली आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे हा रुग्ण शस्रक्रियेनंतर 7 दिवसांत बरा झाल्याची माहिती मिळाली आहे.

हे वाचा-ना दोरीचा आधार ना सुरक्षा कवच; स्पायडर मॅनसारखा भरभर उंच इमारतीवर चढला तरुण

ही घटना ब्रिटनमधील नॉरफोक आणि नॉर्विच विद्यापीठ राष्ट्रीय आरोग्य सेवा रुग्णालयात ही शस्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.सर्जरी करणाऱ्या या रोबोटची किंमत 9.5 कोटी रुपये आहे. ही सर्जरी जुलै महिन्यात करण्यात आली होती आणि त्यासंदर्भात लेख स्थानिक मीडियामध्ये माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी रोबो नव्हता तेव्हा अशा प्रकारचे ऑपरेशन तीन टप्प्यात व्हायचे आणि ते करायला 12 तास किंवा त्यापेक्षा अधिक लागले. मात्र रोबोटमुळे ही शस्रक्रिया करणं अधिक सोपं झालं.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 21, 2020, 8:46 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading