रिपोर्टरने विचारलं, गावात 'विकास' पोहोचला का? आजोबांनी दिलेल्या उत्तराचा VIDEO होतोय तुफान व्हायरल

रिपोर्टरने विचारलं, गावात 'विकास' पोहोचला का? आजोबांनी दिलेल्या उत्तराचा VIDEO होतोय तुफान व्हायरल

आजोबा म्हणाले, विकास....

  • Share this:

पाटना, 17 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दररोज नेत्यांच्या मुलाखती विविध माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहे. यादरम्यान बिहारमधील एका गावातील मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे विकासबाबत मोठा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. एका न्यूज चॅनलच्या रिपोर्टरने लखीसरायच्या एक ज्येष्ठ निवासीला विचारलं, की तुमच्या गावात विकास पोहोचला का? यावर आजोबांनी उत्तर दिलं, 'विकास...मी इथे नव्हतो सर..मी आजारी होतो म्हणून डॉक्टरकडे गेलो होतो..'

रिपोर्टर स्थानिक लोकांना गावातील विकासकार्य आणि बदलाविषयी विचारत होता. यावर आजोबांच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी मीम्स तयार करीत सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे ही वाचा-...म्हणून देशातील गरीब उपाशी; भूकबळीबद्दल काय म्हणाले राहुल गांधी?

येत्या निवडणुकीत बिहार राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत शिवसेनाही लढणार असून दुसरीकेडे NDAमध्ये फुट पडली आहे. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानेही स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. नीतिश कुमार यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही त्यामुळे आम्ही बाहर पडत असल्याचं पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात आता तिरंगी लढत होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 17, 2020, 3:37 PM IST

ताज्या बातम्या