मुंबई, 11 सप्टेंबर : दारू किंवा गांजाची चोरी सहसा माणसांनी केलेली ऐकली आहे पण कधी प्राण्यांनी ही चोरी केल्याचं ऐकण्यात आलं नाही. बऱ्याचदा भुकलेले प्राणी घरात घुसूनही वस्तू अथवा खाद्यपदार्थ चोरून घेऊन जाता पण इथे तर गांजा पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. उंदरानं गांजाच्या शेतीवर डल्ला मारल्याचं समोर आलं आणि खळबळ उडाली.
कॅनडा इथे एका तरुणाच्या गांजाच्या शेतात उंदराने घुसखोरी केली आणि खाण्यास सुरुवात केली. हा उंदीर शेतातलं पिकं खाऊन पळ काढायचा त्यामुळे या पिकाची नासाडी कोण करतं हे सुरुवातीला कळत नव्हतं मात्र एक दिवस हा उंदीर पकडला गेला तो कसा पकडला आणि नेमकं काय झालं जाणून घेऊया.
हे वाचा-यालाच म्हणतात खरी माणूसकी! मेट्रोमधला हा VIRAL VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
कोलिन यांनी फेसबुकवर या उंदराचे गांजाची पानं खाताना फोटो शेअर केले आहेत. हा उंदीर त्यांची गाजांची झाडं चोरी करून घेऊन जात असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे. जोपर्यंत तो बेशुद्ध होत नाही तोपर्यंत त्याचा हा दिनक्रम सुरू होता. मात्र एक दिवस अतिरेक झाला आणि तो बेशुद्ध पडला.
हे वाचा-VIDEO: पाण्यात पाय टाकताच समोर होता 14 फूटी लांब शार्क आणि...
या उंदरानं खूप जास्त गांजाची पानं खाल्ल्यामुळे अशी अवस्था झाल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. या उंदराला गांजा चढल्यानं त्याची शुद्ध हरपली आणि तो उताणा पडला. सुरुवातीला या उंदारावर कोणताच परिणाम झाल्याचं दिसून आलं नाही. पण एक दिवस त्यानं अति केल्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्यांनी या उंदराला पकडून जंगलात सोडल्याचा निर्णय घेतला मात्र नशेची सवय झालेला उंदीच थोडीच ऐकणार होता. सोशल मीडियावर कोलिन यांची ही स्टोरी खूप व्हायरल होत आहे.