हिमाचल प्रदेश, 22 सप्टेंबर : कधी कधी खाण्याच्या शोधात जंगलातील प्राणी माणसांच्या वस्तीत पोहोचतात. अशात जेव्हा माणूस व प्राणी आमने-सामने येतात तेव्हा परिस्थिती अत्यंत गंभीर होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ याचाच पुरावा आहे. ही घटना हिमाचल प्रदेशमधील असल्याचे सांगितले जात आहे.
जेथे एक विशाल अजगर कोणाच्या तरी घरात घुसला. जेव्हा लोकांना याबाबत माहिती मिळाली त्यानंतर घराबाहेर लोक जमा झाले. यादरम्यान एका व्यक्ती बंदूक घेऊन आला व त्याने मुक्या प्राण्यावर गोळ्या घातल्या. यानंतर अजगराचा मृत्यू झाला. हा प्रकार समोर आल्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
आयएफएस धर्मवीर मीना यांनी हा व्हिडीओ 21 सप्टेंबर रोजी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ही अमानवीय घटना सांगण्यासाठी शब्द नाहीत. या व्यक्तीला अटक केल्यानंतर हिमाचल प्रदेशातील वन विभागाने त्याच्याविरोधात केस दाखल केला आहे.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक भला मोठा अजगर घरात घुसून एका कोपऱ्यात बसला आहे. तो स्वत:ला माणसांच्या गर्दीतून लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. यादरम्यान एक व्यक्ती हातात बंदूक घेऊन आला. तो थोडा वेळ अजगराला पाहत होता, त्यानंतर गोळी चालवली. जेव्हा त्याला वेदना होत होत्या तो दुसऱ्या दिशेने सरकू लागला. मात्र त्यानंतर पुन्हा त्याच्यावर गोळीवर चालवण्यात आली आहे. त्यानंतर अजगराचा जागीच मृत्यू झाला. काही वेळातच या व्यक्तीने हा व्हिडीओ डिलीट केला आहे.