....आणि गणरायाच्या मुकुटावर अजगराचे विराजमान, खालापूरचा VIDEO व्हायरल

....आणि गणरायाच्या मुकुटावर अजगराचे विराजमान, खालापूरचा VIDEO व्हायरल

कोरोनाशी दोन हात करणाऱ्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेला वेध आहे ते गणरायाच्या आगमनाचे..

  • Share this:

आनिस शेख, प्रतिनिधी

खालापूर, 09 ऑगस्ट : कोरोनाशी दोन हात करणाऱ्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेला वेध आहे ते गणरायाच्या आगमनाचे. दहा दिवस आपल्या लाडक्याच्या बाप्पांची सेवा करण्यासाठी गणेशभक्त अतूर झाले आहे. खालापूरमध्ये गणरायाची मूर्ती तयार करणाऱ्या मूर्ती शाळेत एक अचंबित करणारा प्रकार घडला आहे.

खालापूर तालुक्यातील मूर्तीकार सतीश लिखमले यांनी दरवर्षीप्रमाणे  गणरायाच्या मूर्ती तयार केल्यात. गणपती तयार करण्याच्या कारखान्यात आगामी गणेशोत्सवासाठी अनेक गणपतीच्या मूर्त्या तयार करून विक्रीसाठी ठेवल्या आहेत. वेगवेगळ्या वेशभूषा तसंच आकर्षित गणेश मूर्त्या या ठिकाणी ग्राहकांना पाहायला मिळत आहे.

शनिवारी सकाळी दहा  वाजेच्या सुमारास लिखमले हे आपल्या कारखान्यावर व्यवसायाकरता आले असता एका गणपतीच्या मुकुटावर चक्क अजगर जातीचा साप वेटोळे करून बसलेला पाहायला मिळाला. गणरायाच्या मुकुटात हा अजगर निवांत बसलेला होता.

अजगराला पाहून लिखमले दुकानातून बाहेर पडले आणि त्यांनी तात्काळ ही घटना सर्पमित्र चेतन चौधरी यांना कळवली. त्यानुसार चौधरी यांनी घटनास्थळी पोहोचून मोठ्या शिताफीने जवळपास चार फुटी अजगर जातीच्या सापाला पकडून सुरक्षितपणे वनात सोडून जीवदान दिले आहे.

काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सव सणाची सर्वत्र तयारी सुरू असताना या घटनेचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरल्यानंतर श्रद्धेच्या भावनेतून काही नागरिक याकडे पाहू लागले आहेत.

Published by: sachin Salve
First published: August 9, 2020, 8:38 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading