मराठी बातम्या /बातम्या /Viral /

व्यक्तीने 2100 रुपयात वस्तू केली खरेदी, त्याची खरी किंमत 360 कोटी!

व्यक्तीने 2100 रुपयात वस्तू केली खरेदी, त्याची खरी किंमत 360 कोटी!

जाणून घ्या काय आहे प्रकरण...

जाणून घ्या काय आहे प्रकरण...

जाणून घ्या काय आहे प्रकरण...

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : एक अमेरिकन (American) व्यक्तीने अवघ्या 2100 रुपयात एक आर्टवर्क खरेदी करून आणलं होतं. मात्र जेव्हा त्यांना या आर्टवर्कची (ArtWork) खरी किंमत कळाली तेव्हा तेदेखील हैराण झाले. ही व्यक्ती एका झटक्यात अरबपती झाली. स्केचची किंमत त्याने घेतलेल्या किंमतीपेक्षा खूप जास्त आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण...

मिरर युकेच्या रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीने आपलं नाव जाहीर केलं नाही. तो मॅसाच्युसेट्स येथील राहणारा आहे. त्याने नुकतच आर्टवर्क सेलकडून एक आई-मुलीचं स्केच खरेदी केला होता. हा स्केच प्रसिद्ध आर्टवर्क रेप्लिका आहे, जे त्याने अवघ्या 2100 रुपये देऊन खरेदी केलं होतं.

एक झटक्यात झाला अरबपती...

पिवळ्या रंगाच्या लेनिन कपड्यावर तयार ही स्केच 15 व्या शतकात तयार करण्यात आलं होतं. हा स्केच जगातील प्रसिद्ध मोनोग्राम्स Albercht Durer ने तयार केलं होतं. एका रिपोर्टनुसार, पुनर्जागरण काळात जर्मन आर्टिस्टचं ओरिजिनल आर्टवर्क आहे. जे स्केच अमेरिकी व्यक्तीने 2100 रुपयात खरेदी केलं आहे. या आर्टवर्कची स्टडी केल्यानंतर याची किंमत 368 कोटी रुपये असल्याचं समोर आलं आहे.

ही स्केच पाहून आर्टवर्क एक्सपर्ट हैराण झाले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, इतक्या कमी किमतीत हे स्केच त्या व्यक्तीला कसं मिळू शकेल. विशेष म्हणजे विकणाऱ्यालादेखील याबाबत माहिती नव्हती. यापूर्वी स्केचसा मेसाच्युसेट्समध्ये 2016 मध्ये दिवंगत वास्तुकार जीन-पॉल कार्लहियनच्या कुटुंबाने विकलं होतं.

एक कला संग्रहकर्ता क्सिफोर्ड शोररने सांगितलं की, हा एक अविश्वसनीय क्षण होता जेव्हा मी Albrecht Durer ची कलाकृती पाहिली. ती एक उत्कृष्ट कलाकृती होती. शोररने सांगितलं की, Durer पुनर्जागरण आंदोलनात एक जर्मन चित्रकार होते.

First published: