मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मालकाने मांजरीला दिली 'खुन्नस', आपोआप आली वळणावर, हा मजेशीर VIDEO पाहून पोट धरून हसाल!

मालकाने मांजरीला दिली 'खुन्नस', आपोआप आली वळणावर, हा मजेशीर VIDEO पाहून पोट धरून हसाल!

मांजरीचे नखरे पाहून तुम्हीही हसाल..एकदा हा व्हिडिओ पाहाच!

मांजरीचे नखरे पाहून तुम्हीही हसाल..एकदा हा व्हिडिओ पाहाच!

मांजरीचे नखरे पाहून तुम्हीही हसाल..एकदा हा व्हिडिओ पाहाच!

  • Published by:  Meenal Gangurde

सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडिओ (Cat Video) खूप आवडीने पाहिले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत आहे. यामध्ये एक मांजर आणि त्याच्या मालकाची केमिस्ट्री पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये मांजर टेबलावर उभी राहून त्यावरील बाटली खाली पाडण्याचा प्रयत्न करते. मांजर ही अशीही थोडी खट्ट्याळ असतेच. मात्र तिचा मालकही तितकाच हुशार असल्याचे दिसते.

टेबलावरुन बाटली पाडण्याचा प्रयत्न करीत असताना नेमकं मांजराच्या पालकाने मांजरीचं हे कृत्य पाहिलं व तिला ओरडू लागला. त्याने हातात एक काठी घेतली व तिला कटाक्ष देऊ लागला. थोळ्यावेळाने प्राणी मालक मांजरीला खुन्नस देऊ लागला. मालकाला अशा अवस्थेत पाहताच ती आपोआप वळणावर आली. यावेळी मांजर घाबरुन खाली लोटणारी बाटली पुन्हा टेबलावर सरकवताना दिसते.

अॅनिमल लवर या पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ लोक खूप पसंत करीत आहे. हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हिडिओला हजारोंमध्ये views मिळाले असून प्राणी प्रेमी त्यातही कॅट लव्हर आवडीने हा व्हिडिओ पाहत आहेत.

प्राणी हा घरातील एक सदस्याप्रणाणे असतो. त्याचं खाण-पिणं, आवडी-निवडी लक्षात घेऊन पालक त्याला वागवत असतात. अनेकजण प्राण्यांसोबतच्या मजेशीर आठवणी शूट करुन ठेवतात व त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतात. विशेष म्हणजे प्राण्यांचे व्हिडिओ पाहणाऱ्या चाहत्यांचा वर्गही खूप मोठा आहे. वरील मांजरीचा व्हिडिओदेखील त्यापैकीच एक आहे.

First published:

Tags: Cat, Viral video.