Home /News /viral /

मुलाचा लॅपटॉप पाहून आई हादरली; Excel sheet मध्ये लिहिलं होतं असं काही की...

मुलाचा लॅपटॉप पाहून आई हादरली; Excel sheet मध्ये लिहिलं होतं असं काही की...

महिलेना याबाबत एका तज्ज्ञाला सल्ला विचारला आहे.

    Parenting Advice : मुलांचे फोन किंवा लॅपटॉपमध्ये (Child's Laptop) कधी कधी पालकांना असं काही पाहायला मिळतं, की जे पाहून ते हैराण होतात. अशीच एक घटना महिलेने पॅरेंटिग एडाव्हायजरी कॉलममध्ये शेअर केली आहे. यामध्ये महिलेले तज्ज्ञांकडून सल्ला मागितला आहे. मुलाच्या लॅपटॉपमध्ये असं काही पाहिल्यानंतर यावर कशी प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल. अमेरिकेतील (US News) एका महिलेने लिहिलं आहे की, माझ्या 14 वर्षांच्या मुलाचं नाव जॅक आहे. मी त्याला त्याचा स्वत:चा लॅपटॉप देत नाही. स्वत:च्या कामासाठी तो आमचा लॅपटॉप शेअर करतो. त्यामुळे तो लॅपटॉरवर काय करतो याकडे नेहमी लक्ष ठेवता येतं. तसं पाहता माझा मुलगा बुद्धीमान आहे. मात्र तो कुणाशी मोकळेपणाने बोलत नाही. एकेदिवशी जेव्हा मी त्याचा फोल्डर तपासत होते तेव्हा मला एक्सेलमध्ये स्प्रेडशील दिसली. शीट उघडल्यानंतर मला काहीतरी विचित्र गोष्ट दिसली. (The mother shuddered to see the childs laptop written in an excel sheet that) हे ही वाचा-PHOTOS: शेतकऱ्याच्या मुलाने लावला चहाचा स्टॉल; आता 22 शहारांमध्ये घालतोय धुमाकूळ जॅकने आपल्या सर्व क्लासमेट्सच्या नावांची यादी तयार केली होती. या नावांच्या पुढे तारीख आणि त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी लिहिल्या होत्या. जसं एका मुलाच्या पुढे लिहिलं होतं की, त्याची आई पोलिसात आहे. दुसऱ्या नावाच्या पुढे लिहिलं होतं की, याच्या इंन्स्टा बायोवर नाव नाहीये. एका मुलाच्या नावाच्या पुढे लिहिलं होतं की, तो जाड लोकांच्या जोकवर हसतो. मुलाची एक्सेल शीट पाहून महिलेला धक्काच बसला. जेव्हा महिलेने मुलाला या शीटबद्दल विचारलं तर त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. मित्रांनी जोडण्यासाठी मुलाची ही पद्धत योग्य की अयोग्य याबाबत महिलेने चिंता व्यक्त केली आहे. यावर एका तज्ज्ञाने सांगितलं की, तुमच्या मुलाने लीस्टमध्ये जे काही लिहिलं आहे, ते नक्कीत चिंताजनक आहे. या वयातील मुलांनी मजा-मस्ती करायला हवी. अशा प्रकारे मित्रांच्या वागणुकीबद्दल डॉक्युमेंट तयार करण्याची आवश्यकता नाही. दुसरी बाब म्हणजे तुम्ही विचारल्यानंतर तो खोटं बोलला. त्याने ती शीट त्याने लिहिली असल्याचं मान्य केलं नाही. त्याला एखाद्या थेरेपिस्टकडे घेऊन जाण्याची गरज आहे. कारण 14 व्या वर्षी मुलाचं असं वागणं योग्य नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या