नवी दिल्ली, 19 मार्च : सर्वात खोडकर प्राण्यांपैकी असणारा एक म्हणजे माकड. ते इकडून तिकडे उड्या मारत, कधी कधी लोकांना त्रास देत, मस्ती करताना दिसतो. माकडांचे अनेक निरनिराळे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. अशातच माकडाच्या खोडकरपणाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल.
हे प्रकरण राजस्थानच्या जयपूरच्या गंगौरी बाजारचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दुकानाच्या वरच्या छतावर एक माकड कसे आरामात बसले आहे आणि त्याने हातात एक कुत्र्याचं पिल्लू देखील धरले आहे. मग काही सेकंदांनंतर माकड तिथून उठतं आणि पिल्लाला हातात धरून निघून जातं. त्याने पिल्लाचे अपहरण केल्याचे दिसते. माकडाने त्या पिल्लाला प्रेमापोटी उचलले की काही धोक्यापासून वाचवायचे हे माहीत आहे का? तो पिल्लाला उचलून का पळून गेला हे माहित नाही मात्र हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जयपुर में गणगौरी बाज़ार में, बन्दर ने किया कुत्ते के बच्चे का अपहरण 😹😹 pic.twitter.com/nIhV0FOcZk
— Hasna Zaroori Hai 🇮🇳 (@HasnaZarooriHai) March 18, 2023
हा मजेदार व्हिडिओ @HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर आयडीवर शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'जयपूरच्या गंगौरी मार्केटमध्ये माकडाने कुत्र्याचे बाळ पळवले'. हा व्हिडिओ 12 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी लोकांनी व्हिडिओलाही लाइक केले आहे.
दरम्यान, माकडाच्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला पहायला मिळाला. अनेकांना मजेशीर कमेटं केलेल्या पहायला मिळाल्या. यापूर्वीही माकडाचे अनेक मजेशीर व्हिडीओ समोर आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monkey, Social media viral, Top trending, Videos viral, Viral