Home /News /viral /

गायीची शिकार करीत होता सिंह; अवघ्या 100 मीटरवरुन लोक घेत होते सेल्फी, VIDEO पाहून बसेल धसका

गायीची शिकार करीत होता सिंह; अवघ्या 100 मीटरवरुन लोक घेत होते सेल्फी, VIDEO पाहून बसेल धसका

भयावह पद्धतीने केलेला सेल्फीचा नाद जिवावर बेतू शकतो, अनेक प्रसंगांनंतरही लोक अशा चूका करीत असतात.

    नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं. प्राण्यांचीदेखील आहे. त्यामुळे आपण त्यांच्यापासून एका अंतरावर राहणं आवश्यक आहे. कारण जर ते आपल्या पैसमध्ये आले तर अवघड होईल. त्यामुळे माणसांनी प्राण्यांच्या वैयक्तीत आयुष्याचा रिस्पेक्ट ठेवायला हवा. एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सिंह शिकार करीत आहे आणि त्याच्यापासून 100 मीटरच्या अंतरावर काही लोक उभे आहेत. ते लोक यादरम्याम सेल्फी घेत आहेत. परिमल नाथवानी या वापरकर्त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक सिंह गायीच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. त्यानंतर हळूच सिंह गायीवर हल्ला करते. यादरम्यान लोक त्याचा व्हिडीओ शूट करीत आहे. ते सिंहाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. हे ही वाचा-लवकरच या 600 ट्रेनसमधून प्रवास करता येणार नाही, मोठे बदल होण्याची शक्यता ट्विटरवर काही वापरकर्त्यानी त्या लोकांचे स्क्रिनशॉट शेअर केले आहे जे त्यावेळी सिंहाच्या शिकारीचा व्हिडीओ शूट करीत होते. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ गीर जंगलातील असल्याचे सांगितले जात आहे. काहींनी तर या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Shocking viral video

    पुढील बातम्या