नवी दिल्ली, 27 मार्च : दिवसभरात सोशल मीडियावर अनेक वैविध्यपूर्ण व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये मनोरंजक, भावुक, धोकादायक, भयानक व्हिडीओ पहायला मिळतात. नेटकरीही मनोरंनासाठी असे व्हिडीओ पाहत असतात. कधी कधी अनेकजण एकमेकांना मदतीचा हात देतात, असेही व्हिडीओ सोशल मीडियावर जास्त पसंतीस उतरतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओने सर्वांची मनं जिंकली आहेत.
आपल्या आजूबाजूला असणारे मुके प्राणी अनेकदा संकटात सापडतात. त्यांच्या वेदना समजून अनेकजण त्यांना मदतीचा हात पुढे करतात. असाच प्रकार सध्या समोर आलेल्या व्हिडीओमघ्ये पहायला मिळतो. खड्ड्यामध्ये पडलेल्या कुत्र्याला व्यक्तीने जेसीबीच्या सहाय्याने वाचवलं आहे.
हेही वाचा - नुकत्याच जन्मलेल्या बाळाने आईला मारली मिठी, पाहून सर्वच थक्क, Video व्हायरल
व्हिडिओमध्ये एक कुत्रा खोल खड्ड्यात पडताना दिसत आहे. त्या खड्ड्यात पडताना त्याची घाबरगुंडी झालेलीही पहायला मिळतेय. कुत्रा खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याला ते शक्य होताना दिसत नाहीये. हे पाहून तिथे काम करणारी एक व्यक्ती जेसीबीच्या सहाय्याने कुत्र्याच्या मदतीसाठी पुढे येते. जेसीबीच्या सहाय्याने कुत्र्याला बाहेर काढण्यात यश येतं. बाहेर सोडताच कुत्रा लगेच तेथून धूम ठोकतो.
Rescuing...pic.twitter.com/2r0pia9sPx
— The Figen (@TheFigen_) March 24, 2023
@TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. व्हिडीओवर सध्या भरपूर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. कुत्र्याला मदत करणाऱ्या व्यक्तीचे लोक कौतुक करत आहेत. त्याला खरा हिरो म्हणत आहेत.
दरम्यान, अनेकदा आपण आपल्या आजूबाजूला राहणारे प्राणी कोणत्या ना कोणत्या संकटात अडकलेले पाहतो. कोणाच्या वेदना समजून असे काही लोक पुढे येतात. त्या मुक्या प्राण्यांना मदत करतात. माणुसकीने भरलेले असे व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील लाखो यूजर्सची मने जिंकली जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Social media viral, Top trending, Videos viral, Viral