मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हॉटेलने शाकाहारी डॉक्टर्सना न सांगताच दिलं चिकन सूप, नंतर जे घडलं....

हॉटेलने शाकाहारी डॉक्टर्सना न सांगताच दिलं चिकन सूप, नंतर जे घडलं....

आपल्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज खाणारे दोन प्रकारचे लोक असतात. नॉनव्हेज खाणाऱ्यांचा प्रश्न नसतो, पण व्हेज खाणारे बरेच लोक नॉनव्हेज सर्व्ह करणाऱ्या हॉटेलमध्ये खाणंही टाळतात.

आपल्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज खाणारे दोन प्रकारचे लोक असतात. नॉनव्हेज खाणाऱ्यांचा प्रश्न नसतो, पण व्हेज खाणारे बरेच लोक नॉनव्हेज सर्व्ह करणाऱ्या हॉटेलमध्ये खाणंही टाळतात.

आपल्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज खाणारे दोन प्रकारचे लोक असतात. नॉनव्हेज खाणाऱ्यांचा प्रश्न नसतो, पण व्हेज खाणारे बरेच लोक नॉनव्हेज सर्व्ह करणाऱ्या हॉटेलमध्ये खाणंही टाळतात.

मुंबई, 23 सप्टेंबर- आपल्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज खाणारे दोन प्रकारचे लोक असतात. नॉनव्हेज खाणाऱ्यांचा प्रश्न नसतो, पण व्हेज खाणारे बरेच लोक नॉनव्हेज सर्व्ह करणाऱ्या हॉटेलमध्ये खाणंही टाळतात. उत्तर प्रदेशमधून असा एक प्रकार समोर आलाय, ज्या ठिकाणी शाकाहारी डॉक्टरांना चिकन सूप देण्यात आलं. या घटनेमुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. मीटिंगसाठी जमलेल्या डॉक्टरांना न सांगताच चिकन सूप सर्व्ह करण्यात आलं. डॉक्टरांना याबद्दल कळताच गोंधळ झाला आणि त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटशी वाद घातला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. डिनरच्या आधी डॉक्टरांना देण्यात आलं होतं सूप उत्तर प्रदेशातील बरेलीतील एका हॉटेलमध्ये डॉक्टरांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रात्रीचं जेवणही ठेवण्यात आलं होतं. स्टार्टरमध्ये सर्व डॉक्टरांना सूप देण्यात आले होते. ज्यांना सूप देण्यात आलं ते सर्व डॉक्टर शाकाहारी होते, परंतु, त्यांना चिकन सूप सर्व्ह करण्यात आलं. डॉक्टरांना ही बाब माहीत नव्हती, पण आपण प्यायलेलं सूप हे चिकन सूप असल्याचं डॉक्टरांना कळताच एकच गोंधळ उडाला. या प्रकरणाची चौकशी केली असता एका वेटरच्या निष्काळजीपणामुळे या सर्व डॉक्टरांना चिकन सूप सर्व्ह केल्याचं आढळून आलं. हॉटेल मॅनेजमेंटने मागितली माफी याचदरम्यान हॉटेल मॅनेजर दुसऱ्या समाजाचा असल्याचीही चर्चा सुरू झाली होती, त्यामुळे हे प्रकरण आणखी तापलं. यानंतर हॉटेल मॅनेजमेंटने डॉक्टरांची हात जोडून तोंडी माफी मागितलीच पण या संपूर्ण घटनेवर लेखी माफीही मागितली. मात्र, बैठकीला उपस्थित डॉक्टरांनी हॉटेल मॅनेजमेंटवर कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. मॅनेजमेंटकडे तक्रार केल्यानंतर आणि मॅनेजमेंटने माफी मागितल्यानंतर डॉक्टरांनी ही साधी चूक होती असं मानून माफही केलं. ( हे वाचा:तुम्हाला पायही ठेवावासा वाटणार नाही, अशा ठिकाणी नवरीबाईने हौशीने केलं फोटोशूट; पाहा VIDEO ) एका डॉक्टरने सांगितले की, मीटिंगदरम्यान सूप देण्यात आलं तेव्हा ते नॉनव्हेज असल्याचं सांगण्यात आलं नव्हतं, परंतु नंतर माहिती कळाल्यावर आक्षेप घेण्यात आला. या प्रकारानंतर काही डॉक्टरांनी जेवणही केलं नाही. मॅनेजमेंटशी डॉक्टर याबद्दल बोलल्यावर वेटरकडून चूक झाल्याचं लक्षात आलं आणि नंतर त्यांनी माफी मागितली आणि भविष्यात असं होणार नाही, याची ग्वाही दिली. आता त्यांनी माफी मागितली आणि चूक मान्य केली, त्यानंतर आपण याबद्दल काय करू शकतो? कारण, कोणीही जाणीवपूर्वक चूक करत नाही. मीटिंगमध्ये जवळपास 20-25 डॉक्टर होते. आम्ही मॅनेजमेंटकडे तक्रार केली असून, मॅनेजमेंटने या प्रकरणात कारवाई केली आहे. त्यामुळे आम्हीही माफ करून विषय इथेच संपवला.’
First published:

Tags: Viral, Viral news

पुढील बातम्या