मराठी बातम्या /बातम्या /Viral /दोन मुलींच्या जन्मानंतर वडिलांनी केली मातृत्वाची इच्छा पूर्ण, लेकींना जबर धक्का!

दोन मुलींच्या जन्मानंतर वडिलांनी केली मातृत्वाची इच्छा पूर्ण, लेकींना जबर धक्का!

वडिलांना त्या रुपात पाहून मुलींना जबर धक्काच बसला...

वडिलांना त्या रुपात पाहून मुलींना जबर धक्काच बसला...

वडिलांना त्या रुपात पाहून मुलींना जबर धक्काच बसला...

  कॅनडा, 4 ऑगस्ट : आपल्या शरीरात हॉर्मोन्स अर्थात संप्रेरकं अगदी छोट्या प्रमाणात स्रवत असली, तरी त्यांचं काम आणि त्यांचा प्रभाव खूपच मोठा असतो; पण लहान मुलांना कुठे याबद्दल माहिती असतं. किंबहुना मोठ्या माणसांनाही या हॉर्मोन्सच्या (Hormones) प्रभावाबद्दल समजून घेणं सहज शक्य होत नाही. मग एके दिवशी अचानक मुलांचे वडील आईसारखं राहायला लागले (Transgender) किंवा तिच्यासारखे कपडे घालायला लागले, तर मुलं घाबरून जाणारच. कॅनडात (Canada) राहणाऱ्या 36 वर्षांच्या Tea-Lynn Van Dyk यांनी आपलं लिंगपरिवर्तन (Gender Change) केलं त्यामुळे त्यांना स्वतःला खूप बरं वाटू लागलं; मात्र त्यांच्या मुलांना खूप मोठा धक्का बसला.

  Tea-Lynn Van Dyk यांची पत्नी गॅब्रिएला (Gabrielle Van Dyk) यांनी सांगितलं, की आपल्या जीवनात एवढा मोठा बदल झालाय, हे त्यांची मुलं किमान तीन दिवस तरी स्वीकारतच नव्हती. त्यांच्या सहा वर्षांच्या छोट्या मुलीला घरात दुसरी आई आल्यामुळे खूप चांगलं वाटत होतं; मात्र मोठ्या मुलीला वडिलांची उणीव भासत होती. गॅब्रिएला सांगतात, की 'माझ्या पतीने लिंगपरिवर्तन केल्यानंतरही त्यांच्यामध्ये काही विशेष बदल मला आढळलेले नाहीत.'

  हे ही वाचा-'उन्हें मत बताना...'! किल्ल्यातून येणाऱ्या त्या आवाजाचं अजब कारण ऐकून उडेल थरकाप

  35 वर्षं वय असलेल्या गॅब्रिएला सांगतात, की त्यांच्या पतीने जेव्हा लिंगपरिवर्तन करून घेऊन त्यांचीच पत्नी होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याबद्दल त्यांना स्वतःला काही आक्षेप नव्हता; मात्र मुलं छोटी असल्याने त्यांना कसं समजवायचं हा प्रश्न त्यांना सतावत होता. वडिलांबद्दल ही गोष्ट कळल्यावर तीन दिवस त्यांच्या मुलांना पॅनिक अॅटॅक आले. छोट्या मुलीने हे लवकर समजून घेतलं आणि ती बाकीच्यांनाही हे सांगत होती, की बाबा आता आई बनले आहेत; मात्र मोठ्या मुलीने हे सत्य पटवून घ्यायला दोन आठवडे लागले. सात वर्षांच्या आर्याला मोठ्या तणावाचा (Trauma) सामना करावा लागला. लिंगपरिवर्तन केल्यानंतर टी लिन यांनी आपल्या मुलांना सांगितलं, की आता ते त्यांची मम्मी आहेत आणि गॅब्रिएला त्यांची मम्मा.

  गॅब्रिएला सांगतात, की त्यांच्या पतीबद्दल त्यांना जेव्हा हे कळलं, तेव्हा त्या पतीसोबत थेरपिस्टकडे (Therapist) गेल्या. टी लिन यांना असं वाटत होतं, की हे सगळं कळल्यावर आपली पत्नी आपल्याला सोडून देईल आणि आपला घटस्फोट होईल. प्रत्यक्षात मात्र असं काही झालं नाही. त्यांच्या पत्नीने त्यांना, त्यांच्या भावनांना समजून घेतलं आणि त्यांना साथ दिली. त्यामुळे त्यांची लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करून घेण्यात काहीच अडचण उरली नाही. आता गॅब्रिएला यांचे पती गॅब्रिएला यांचेच कपडे घालून तयार होतात आणि त्यांच्याप्रमाणेच वागतात. ते आता स्वतःला गॅब्रिएलाचा पती नव्हे, तर पत्नी मानतात.

  गॅब्रिएला यांची या बाबतीत असलेली भूमिका स्पष्ट आहे. आपल्या पतीचं बाहेरचं रूप बदललं असलं, तरी ते आधीप्रमाणेच माणूस आहेत. त्यामुळे ते कुठले कपडे घालतात, स्त्रीसारखे वागतात, याचा आपल्याला काही फरक पडत नाही, असं गॅब्रिएला सांगतात. आम्ही आजही एकत्र आहोत, असं सांगायलाही त्या विसरत नाहीत.

  First published:
  top videos

   Tags: Canada, Mother, Transgender, Viral