Home /News /viral /

शेतकरी घरात पाळत होता बिबट्याची पिल्लं; उलगडा झाल्यानंतर झाली भयंकर अवस्था!

शेतकरी घरात पाळत होता बिबट्याची पिल्लं; उलगडा झाल्यानंतर झाली भयंकर अवस्था!

शेतकरी पिल्लांची खूप काळजी घेत होता, त्यांना नियमित दूध देत होता. थंडी पासून बचाव करण्यासाठी अंगावर गरम कपडे देखील पांघरत होता. जेव्हा याचा खुलासा झाला, त्यानंतर तो हादरलाच.

    इंदूर, 11 डिसेंबर : धारमधील (Indore News) निसरपुर येथील बाजरीखेडा गावात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. येथे राहणारे शेतकरी किरण गिरी यांना चार दिवसांपूर्वी आपल्या दोन पिल्ल दिसली होती. त्यांना वाटलं ती मांजराची पिल्ल आहेत. त्यामुळे दोन्ही पिल्लांना घेऊन ते घरी आले. त्यांना दूधही दिलं. मात्र काही दिवसांनी असं काही घडलं की, आपण आणलेली पिल्लं मांजरीची नाही तर बिबट्याची (leopard) असल्याचा खुलासा झाला. यानंतर शेतकऱ्याने वन विभागाला (Forest Department) याबाबत माहिती दिली. त्यांनीदेखील जंगली मांजल असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना पुन्हा घरी घेऊ आला आणि तीन दिवस त्यांची चांगलीच काळजी घेतली. पिल्लांना नियमित दूध देत होते, याशिवाय रोज आंघोळही घालत होता. थंडी पासून बचाव करण्यासाठी अंगावर गरम कपडे देखील पांघरत होता. जेव्हा याचा खुलासा झाला, त्यानंतर तो हादरलाच. हे ही वाचा-इवल्याशा कासवाने घेतला कुत्र्यासोबत पंगा; दादागिरी पाहून व्हाल अचंबित, VIDEO चार दिवसांपूर्वी बाजरीखेडा येथे राहणाऱ्यांनी वन विभागाला सांगितलं होतं की, ऊसाच्या शेतातून दोन पिल्लं भेटली आहेत. ते बिबट्यांच्या पिल्लासारखी दिसतात. मात्र वन विभागाने ते जंगली मांजराची पिल्लं असल्याचं सांगितलं. त्यांना पुन्हा जंगलात सोडण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र शेतकरी दोघांना सोबत घेऊन आला. तीन दिवसांनंतर पिल्ल गुरगुरू लागली त्यानंतर मात्र शेतकऱ्याला संशय आहे. मांजराची पिल्ल तर गुरगुरत नाहीत. यानंतर त्याने गावकऱ्यांनाही याबाबत सांगितलं. त्यानंतर गावकऱ्यांनीही बिबट्याची पिल्लं असल्याची शक्यता वर्तवली. यानंतर शेतकरी पिल्लांना निसरपूर पोलीस ठाण्यात घेऊन आला. पोलिसांनी वन विभागाला याबाबत सूचना दिली. यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बिबट्याचीच पिल्लं असल्याचं मान्य केलं. यापैकी एक नर आणि दुसरी मादी आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Indore, Indore News, Leopard

    पुढील बातम्या