Home /News /viral /

ऊसाच्या शोधात हत्ती पोहोचला गावात; रागाच्या भरात घातला गोंधळ, पाहा Viral Video

ऊसाच्या शोधात हत्ती पोहोचला गावात; रागाच्या भरात घातला गोंधळ, पाहा Viral Video

सोशल मीडियावर (Social Media) एका रागीट हत्तीचा (Angry Elephant) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. जो पाहून तुम्हीही घाबराल.

    उत्तराखंड, 20 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) एका रागीट हत्तीचा (Angry Elephant) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. जो पाहून तुम्हीही घाबराल. उपाशी हत्ती ऊसाच्या शोधात उत्तराखंडमधील (Uttarakhand) एका गावात शिरला. खायला न मिळाल्यानं त्याचा राग अनावर झाला आणि त्याने गावभर गोंधळ घातला. त्याच्या समोर जे कोणी येत होतं तो त्यांच्यावर हल्ला करीत होता. अनेक तास गावात गोंधळ घातल्यानंतर तो निघून गेला. मात्र अद्यापही गावात हत्तीची दहशत आहे आणि यामुळे गावकरी चिंतेत आहेत. हल्दानी तराई केंद्रीय वन प्रभागाजवळील एका ग्रामीण भागात दोन हत्तींची दहशत परसरली आहे. हत्ती वारंवार गावात ऊसाच्या शेतात जाऊन नुकसान करीत आहे. हत्तीचा कळप शेतकऱ्यांच्या शेतात घुसून त्यांचं नुकसान करीत आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे गावातील परिस्थितीचा अंदाज येऊ शकेल. हल्दानीच्या हरिपूर भानदेव गावातील एका घराच्या अंगणातून हत्ती जात असताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी हत्तीला पाहून लोकांनी आरडाओरडा केला. हे ही वाचा-जॅग्वारने पाण्याच्या आता अशी केली शिकार, PHOTOS पाहून व्हाल हैराण हत्ती जे समोर दिसेल तर हटवून पुढे जात आहे. जोपर्यंत हत्ती या भागात आहे, लोकांमध्ये दहशत कायम आहे. ऊसासाठी हत्ती पुन्हा गावात येण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांची चिंता अधिक वाढली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या