Home /News /viral /

भरपावसात हत्तीणीने दिला पिल्लाला जन्म, कुटुंबाने मिळून आनंद केला साजरा; अंगावर शहारा आणणारा VIDEO

भरपावसात हत्तीणीने दिला पिल्लाला जन्म, कुटुंबाने मिळून आनंद केला साजरा; अंगावर शहारा आणणारा VIDEO

निसर्ग अद्भूत आहे. हत्तीणीचा प्रसुतीचा हा व्हिडीओ पाहून असंच वाटत राहतं

    नवी दिल्ली, 4 जानेवारी : हत्तीणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्तीणीची (Elephant) प्रसुती होत आहे. हत्तीच्या पिल्ल्याच्या जन्मानंतर बरेच हत्ती एकत्र येतात आणि पिल्लाभोवती फिरतात. जणू प्रत्येकजण पिल्लाच्या जन्माचा आनंदात साजरा करत असतो. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (The elephant gave birth to a pup) पिल्लाच्या जन्माचा साजरा केला आनंद हा व्हिडीओ भारतीय वन अधिकारी (आयएफएस) परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की हत्तीणीचं पिल्लू जमिनीवर व्यवस्थित उभे राहू शकत नाही. (The elephant gave birth to a pup) तसेच बरेच हत्ती पिल्लाच्या भोवती येऊन नाचत आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल प्राण्यांचे असे व्हिडीओ (अ‍ॅनिमल व्हायरल व्हिडिओ) दररोज पाहायला मिळतात. पण हा व्हिडीओ खूप खास असून सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि त्याला खूप पसंत केलं जात आहे. या व्हिडीओला 400 हून अधिक Views मिळाली आहेत. बरेच लोक या व्हिडीओवर टिप्पण्याही करीत ​​आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलं आहे की, निसर्ग ही एक अतिशय सुंदर गोष्ट आहे, जी दररोज नव नवीन अनुभव देते. (The elephant gave birth to a pup) आपण सोशल मीडियावर हत्तीचे बरेच व्हिडीओ पाहिले असतील. मात्र सोशल मीडियावरुन हा अत्यंत सुंदर व्हिडीओ आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या