• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ड्रायव्हरच्या एका मागोमाग एक लगावल्या कानशिलात; तरुणीचं रौद्र रुप बघून पोलीसही हादरले, पाहा VIDEO

ड्रायव्हरच्या एका मागोमाग एक लगावल्या कानशिलात; तरुणीचं रौद्र रुप बघून पोलीसही हादरले, पाहा VIDEO

भरचौकात तरुणीने ड्रायव्हरला खूप मारलं. हा VIDEO सध्या तुफान व्हायरल होत आहे.

 • Share this:
  लखनऊ, 1 ऑगस्ट : उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊमध्ये (Lucknow) रविवार एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी भररस्त्यात एका तरुणाला मारहाण करीत असल्याचं दिसत आहे. ही तरुणी एकमागून एक तरुणाच्या कानशिलात लगावत आहे. हा व्हिडीओ कृष्णानगर पोलीस हद्दीतील आहे. येथे शनिवारी रात्री कारची धडक लागल्याने एका तरुणीने भररस्त्यात ड्रायव्हरला मारहाण केली. काहींच्या मते तरुणीला गाडीचा स्पर्श झाला होता. मात्र त्यानंतर संपातलेल्या तरुणीने ड्रायव्हरच्या कानशिलात लगावल्या. (The driver was slapped again and again by a young lady video goes viral) हा सर्व प्रकार सुरू होता, त्यावेळी चौकात वाहतुक कोंडी झाली होती. नाक्यावरील पोलीस कर्मचारीदेखील तरुणीची वागणूक बघून तातडीने तिच्या जवळ जाण्याची हिम्मत करू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधून जाणाऱ्या एका तरुणाने तरुणीला धडक दिली होती. यामुळे नाराज तरुणीने आरोपी ड्रायव्हरला गाडीखाली उतरवलं, आणि त्याला मारहाण केली. याशिवाय ड्रायव्हरसोबत असलेल्यांचाही तरुणीने समाचार घेतला. तरुणाला काही कळायच्या आत तरुणी एकामागोमाग एक कानशिलात लगावत राहिली. काही वेळाने तरुणीला असं मारहाण करताना पाहून उभा असलेला वाहतूक पोलीस तेथे जाऊ पोहोचला. हे ही वाचा-VIDEO : सेल्फी घेताना तलावात दिसली हालचाल; पर्यटकांसमोरच तरुणाने तडफडत सोडला जीव मात्र तरुणीला अडवण्याऐवजी तोदेखील उभं राहून हे सर्व पाहत राहिला. त्यानंतर पोलीस तरुणी आणि मार खाणाऱ्या आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचं नाव शहादद अली, इनायत अली आणि दाऊद आहेत. तिघांविरोधात शांती भंग प्रकरणात चलान कापण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. video मध्ये तुम्ही पाहू शकता की, भरचौकात तरुणीने अत्यंत आवेगाने ड्रायव्हरची मारहाण केली. ड्रायव्हर तरुणीचा मार खाताना तिची विनवणी करीत होता. मात्र तरुणी काहीच ऐकायला तयार नव्हती. ती उड्या मारून मारून त्याला मारतच होती.

  Published by:Meenal Gangurde
  First published: