गाढ झोपलेल्या बिबट्यावर जंगलाच्या राजाने केला हल्ला; VIDEO मध्ये पाहा कोणी मारली बाजी

गाढ झोपलेल्या बिबट्यावर जंगलाच्या राजाने केला हल्ला; VIDEO मध्ये पाहा कोणी मारली बाजी

जंगलाचा राजा सिंह (lion) आणि चपळ बिबट्या(leopard). या दोघांची जर एकमेकांसोबत लढाई (fight) झाली तर जिंकणार कोण हे सांगणं कठीण आहे.

  • Share this:

जंगलाचा राजा सिंह (lion) आणि चपळ बिबट्या(leopard). या दोघांची जर एकमेकांसोबत लढाई (fight) झाली तर जिंकणार कोण हे सांगणं कठीण आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (video viral on social media) झाला आहे. यामध्ये बिबट्या आणि सिंह दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. याबाबत टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय.

बिबट्या आणि सिंह दोघेही शक्तिशाली आणि शिकारी प्राणी आहेत. सिंह जंगलाचा राजा असला तरी बिबट्यादेखील कमी नाही. दोघंही अवघ्या काळी वेळात कोणत्याही प्राण्याचा,शिकारीचा फडशा पाडू शकतात. त्यामुळे शिकारीसाठी किंवा इतर कारणांनी दोघंही कधी ना कधी तर एकमेकांसमोर उभे ठाकतात. या दोघांच्या अशाच झटापटीचा एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर झपाट्याने व्हायरल होतोय.

या व्हिडिओत बिबट्या एका उंच जागेवर पहुडला आहे. थोड्या वेळात तिथं सिंह येतो आणि डरकाळी फोडत बिबट्यावर हल्ला करतो. त्याच्या हल्ल्यानंतर चपळ बिबट्यादेखील उठून सिंहाच्या अंगावर धावून जातो. थोडा वेळ या दोघांमध्ये चांगलीच झटापट होते. मात्र,कदाचित सिंहासमोर आपला काही टिकाव लागणार नाही या भावनेतून बिबट्या उंचीवरून खाली उडी घेत पळून जातो. सिंह देखील त्याच्या मागे पळतो.

हे ही वाचा-बाबो! गाडी पडली 25 कोटीला, नंबर प्लेटसाठी 52 कोटींचा खर्च; VIDEO पाहून व्हाल शॉक

ट्विटरवर हा व्हिडिओ आफ्रिकन ॲनिमल्स (African animals)नावाच्या पेजवरून शेअर केला गेलाय. या व्हिडिओला आतापर्यंत 53 हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलंय. तर,200पेक्षा जास्त जणांनीरि-ट्वीटकेलाय आणि 1500 पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाईक केलाय. काही युझर्सनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एक युझर म्हणतो,तुमच्या शत्रुपासून वाचायचं असेल,तर त्यांच्यावर नजर ठेवणं गरजेचं असतं,नाहीतर तुमच्या सोबतही असं होऊ शकतं जे या बिबट्यासोबत झालं. तर,दुसरा एक म्हणाला,हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला बिबट्याची भिती वाटणं बंद झालंय. हा सिंह बिबट्याला निवांत झोपू पण देत नाहीए असं म्हणत एका नेटकऱ्याने हसणारे इमोजी टाकले आहेत.

एकंदरीतच सिंह आणि बिबट्याच्या या झटापटीचा नेटकऱ्यांनी आनंद घेतलाय. काही जण सिंहाचं कौतूक करताहेत. तर,काही नेटकरी सिंहानं बिबट्याची झोप उडवली म्हणत मजा घेत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिला तर नक्की पाहा.

First published: May 15, 2021, 8:48 PM IST

ताज्या बातम्या