नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) वाइल्डलाइफ व्हिडीओ (Wildlife Video) खूप पसंत केले जातात. विशेषत: प्राण्यांमधील फायटिंग. इंटरनेटवर असे अनेक व्हिडीओ आहेत, ज्यामध्ये प्राण्यांमध्ये भयंकर फायटिंग पाहायला मिळते. तुम्ही सिंह, बिबट्या आणि हत्तींचा लढा बर्याचदा पाहिला असेल. परंतु कधी जंगली म्हशींची लढाई पाहिली आहे का? (Fight Between Two Indian Gaur) या व्हिडिओची इंटरनेटवर खूप चर्चा आहे. हा व्हिडिओ भारतीय वन अधिकारी पी बालामुरुगन पी. (IFS Officer Balamurugan P) यांनी शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन भारतीय म्हशी उभ्या आहेत. तेव्हा दोघीजणी एकमेकांवर शिंगांनी हल्ला करण्यास सुरवात करतात. तिथे एक कुत्रा देखील उभा आहे, जो लढा पाहून भुंकू लागतो.
दोघेही भांडत करीत करीत रस्त्यावर येतात. आजूबाजूला बरेच लोक उभे असल्याचे दिसत आहे. अनेकजण हे भांडण मोबाईलवर रेकॉर्ड करीत आहेत. हा व्हिडीओ त्यांनी 29 नोव्हेंबर रोजी शेअर केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे.