Home /News /viral /

लता दीदींचं गाणं गातेय 2 वर्षांची मुलगी, हा VIDEO नाही तर मग काय पाहिलं!

लता दीदींचं गाणं गातेय 2 वर्षांची मुलगी, हा VIDEO नाही तर मग काय पाहिलं!

अवघ्या 2 वर्षांच्या मुलीचा हा व्हिडिओ सर्वांनाच भूरळ घालतो...

  मुंबई, 05 फेब्रुवारी : हल्ली सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. अनेक जण आपले व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करतात आणि बघबघता तो व्हिडिओ हीट होऊन जातो. अलीकडे रानू मंडल यांचा व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता. आज रानू मंडल रातोरात स्टार झाल्या आहे. रानू यांनी लता मंगेशकर यांचं गाणं गाऊन सर्वांची वाहवाह मिळवली होती. आता आणखी एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण, हा व्हिडिओ आहे अवघ्या 2 वर्षांच्या मुलीचा.. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ही मुलगी 'उठे सबके कदम... तारा रम पम...' हे लता दीदींचं गाणं गाताना दिसत आहे. या मुलीच्या गोड आवाजनं सर्वांची मनं जिंकली आहेत. रानू मंडल यांच्यानंतर सध्या ही मुलगी सोशल मीडिया सेन्सेशन ठरत आहे. बोबडे बोल आणि गोड आवाज हे सर्वच नेटकऱ्यांना भूरळ घालणारं ठरत आहे. अभिषेक बच्चन घरात कोणाला घाबरतो? आई जया बच्चन यांना की बायको ऐश्वर्याला... या मुलीनं गायलेलं हे गाणं ‘बात बात में’ या सिनेमातील आहे. यासिनेमात टीना मुनीम आणि अमोल पालेकर यांच्या भूमिका आहेत. हे मूळ गाणं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलं असून या मुलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
  View this post on Instagram

  #Musicon #lagjagale🎵 #latamangeshkarji 🙏🙏🙏#babygirl🎀

  A post shared by Pragya Medha (@pragyamedha11) on

  या आधीही या मुलीचा लग जा गले या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही 2 वर्षांचा मुलगी लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रसिद्ध गान 'लग जा गले'(Lag Ja Gale) गाताना दिसली होती. हे गाणं 1964 मध्ये आलेल्या 'वो कौन थी' (Wo Kaun Thi) या चित्रपटातील आहे. या मुलीचं नाव आहे प्रज्ञा मेधा. या चिमुरडीने अत्यंत सुमधूर आवाजात हे गाणं गायलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत समोर आला आमिर खानचा नवा लुक, पाहा PHOTO भावाच्या लग्नात करिना-करिश्माचे ठुमके, पाहा रॉयल वेडिंगचे INSIDE VIDEO
  Published by:Megha Jethe
  First published:

  पुढील बातम्या