मराठी बातम्या /बातम्या /Viral /भारतीय मजुरांना दंडित करण्यासाठी इंग्रज वापरत असलेली तोफ आजही चालू स्थितीत

भारतीय मजुरांना दंडित करण्यासाठी इंग्रज वापरत असलेली तोफ आजही चालू स्थितीत

संग्रहित

संग्रहित

ब्रिटिशांच्या शासनकाळात चहाच्या मळ्यांमध्ये मजुरांना फुकट राबवून घेतलं जात असे. जे मजूर असं काम करण्यास नकार देत असत, त्यांना या तोफेच्या साह्याने थेट मारून टाकलं जात असे.

  • Local18
  • Last Updated :
  • Maharashtra, India

    मुंबई, 31 जानेवारी- ब्रिटिशांच्या काळात स्वाभिमानी भारतीय कामगारांना जिवे मारण्यासाठी वापरण्यात आलेली इंग्रजांची तोफ सध्या मध्य प्रदेशातल्या शिवपुरी जिल्ह्यातल्या अशोक मोहिते नावाच्या एका व्यक्तीकडे आहे. ती छोटी तोफ केवळ चार इंचांची आहे; मात्र ती आजही चालू स्थितीत आहे.

    ब्रिटिशांच्या शासनकाळात चहाच्या मळ्यांमध्ये मजुरांना फुकट राबवून घेतलं जात असे. जे मजूर असं काम करण्यास नकार देत असत, त्यांना या तोफेच्या साह्याने थेट मारून टाकलं जात असे. जनरल जे. एच. व्हीलरच्या आदेशानंतर तोफेची बत्ती पेटवल्यावर गोळी थेट त्या मजुराच्या छातीचा वेध घेत असे. ही जगातल्या सर्वांत छोट्या तोफांपैकी एक आहे आणि ती आजही अशोक मोहिते यांच्याकडे सुरक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या छत्री ट्रस्टचे अशोक मोहिते हे व्यवस्थापक आहेत. मिश्रधातूपासून तयार करण्यात आलेली ही तोफ आजही चालू स्थितीत आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे.

    (हे वाचा: जपानमधल्या 'जोहात्सू' विषयी माहिती आहे का? अचानक गायब होतात माणसं...!)

    इंग्रजाच्या शासनकाळात नैनिताल ही उन्हाळ्यातली राजधानी असे. तेव्हा इंग्रजांनी तिथे चहाचे मळे लावले होते. त्यात जनरल व्हीलर यांचं विशेष योगदान होतं. त्यांचे वंशज लिंकन व्हीलर 1948पर्यंत तिथे राहत होते. त्यांनी आजोबांच्या अनेक आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्यातल्याच एका आठवणीत असं लिहिलं आहे, की चहा आणि सफरचंदाच्या बागेत काम करण्यास जे मजूर नकार देत, त्यांना जे. एच. व्हीलर स्वतःसोबत बसवून खाऊ-पिऊ घालायचे आणि कार्यलयात बसून गप्पा मारता मारता आपल्या सिगारने तोफेची बत्ती पेटवून त्या मजुरांना मृत्युदंड द्यायचे.

    अशोक मोहिते यांनी ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू जपून ठेवल्या आहेत. त्यांनी सांगितलं, की ही तोफ राजस्थानातल्या बिकानेरच्या तत्कालीन महाराजांनी जनरल व्हीलर यांना भेट म्हणून दिली होती. नंतर त्यांचे नातू जे. एच. व्हीलर यांनी त्या तोफेचा मजुरांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यासाठी वापर केला. मोहिते यांनी असा दावा केला, की जगातल्या सर्वांत लहान तोफांपैकी एक असलेल्या या तोफेची मारक क्षमता 32 बोअरच्या रिव्हॉल्व्हरमधून निघालेल्या गोळीपेक्षा जास्त आहे.

    अशोक मोहिते यांनी सांगितलं, की छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे त्यांचे पूर्वज. 1682 साली औरंगजेबाशी लढताना तोफेचा गोळा लागून त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे त्यांना तोफ या विषयात विशेष रस असल्याचं त्यांनी सांगितलं. जनरल व्हीलरचा वंशज लिंकन व्हीलर जेव्हा 1948 साली भारत सोडून गेला, तेव्हा नैनितालमधल्या बेवारस घरांवर तिथल्या नागरिकांनी कब्जा केला होता. त्यात अनेक ज्ञात-अज्ञात मौल्यवान वस्तू होत्या. त्या वस्तू ती माणसं वेळोवेळी विकत होती. एका महिलेने त्यांच्याकडून मिश्रधातूची ही तोफ खरेदी केली होती. मोहिते यांच्या म्हणण्यानुसार ते आजही खास प्रसंगी ती तोफ चालवतात.

    First published:

    Tags: Lokmat news 18, Viral news