मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'आमच्याकडून चूक झाली...'; चोरांनीच दिली कबुली, सत्य समोर आल्यानंतर चोरीच्या वस्तूही केल्या परत

'आमच्याकडून चूक झाली...'; चोरांनीच दिली कबुली, सत्य समोर आल्यानंतर चोरीच्या वस्तूही केल्या परत

विशेष म्हणजे या वस्तू परत करताना चोरांनी त्या व्यक्तीला एक पत्रही लिहिलं आहे.

विशेष म्हणजे या वस्तू परत करताना चोरांनी त्या व्यक्तीला एक पत्रही लिहिलं आहे.

विशेष म्हणजे या वस्तू परत करताना चोरांनी त्या व्यक्तीला एक पत्रही लिहिलं आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

लखनऊ, 24 डिसेंबर : उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात चोरांनी एका गरीब व्यक्तीच्या घरात चोरी केली. यानंतर त्यांनी जे काही केलं ते वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. चोरी केल्यानंतर चोरांनी त्यांचं सामान परत केलं आणि एक पत्र लिहून माफी मागितली. या घटनेवरुन परिसरात सध्या मोठी चर्चा सुरू आहे.

40 हजारांचं कर्ज घेऊन दुकानं केलं होतं सुरू..

मिळालेल्या माहितीनुसार, बांदा जिल्ह्यातील बिसंडा पोलीस ठाणे हद्दीकील चंद्रायल गावात राहणारे दिनेश तिवारी गरीब आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी 40 हजार रुपयांचं कर्ज घेऊन वेल्डिंगचं एक दुकान सुरू केलं होतं. नेहमीप्रमाणे 20 डिसेंबरच्या सकाळी तो आपल्या दुकानात पोहोचला तर त्याला धक्काच बसला. त्याच्या दुकानाचं टाळं तुटलं होतं, आणि अनेक सामानांची चोरी झाली होती. जेव्हा चोरांना कळालं की, दिनेश तिवारी गरीब आहे, त्यानंतर चोरांनाही आपण केलेल्या कृत्याचं वाईट वाटलं. यासाठी चोरांनी एका कागदावर दिनेश तिवारी यांच्याकडून माफी मागितली.

चोरांनी कागदावर लिहिला माफीनामा...

चोरांनी कागदावर लिहिलं की, हे दिनेश तिवारी यांचं सामान आहे. आमच्या बाहेरील माणसांकडून तुमच्याबद्दल कळालं होतं. आम्ही तुमची माफी मागतो. चुकीचं लोकेशन दिल्यामुळे आमच्याकडून चूक झाली. या सर्व घटनेमुळे पोलीसदेखील हैराण झाले आहेत. ते म्हणाले की, हे हास्यास्पद आहे, की, चोराने चोरी केलेल्या वस्तू पुन्हा आणून दिल्या. ते म्हणाले की, अगदी फिल्मी बाब घडली.

हे ही वाचा-धक्कादायक! सोलापुरात 4 कामगारांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू; 2 जणं जखमी

सामान पाहिल्यानंतर दिनेश तिवारी आनंदले...

दुसरीकडे दिनेश तिवारी यांनी जेव्हा त्यांचं सामान पाहिलं तर ते खूप खूश झाले. त्यांनी सांगितलं की, चोराने त्यांच्या दुकानाकून 2 वेल्डिंग मशीन, 1 मोठी कटर मशीन, एक मोजमाप करणारं मशीन, एक ग्लेंडर आणि 1 ड्रिल मशीनची चोरी केली होती. चोरांनी हे सर्व सामान परत केलं, याशिवाय त्या पत्राचीही मोठी चर्चा सुरू आहे. ज्यात लिहिलं की, चुकून चोरी झाली.

First published:

Tags: Photo viral, Uttar pradesh news