संभल, 31 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर फिरणाऱ्या म्हैस आणि बैलांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घालायला सुरुवात केली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारासमोर एका चवताळलेल्या म्हशीनं धडक दिली आणि त्याला शिंगावर घेऊन जोरात आपटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रागाच्या भरात ही म्हैस तिथेच थांबली नाही तर शिंगावर घेऊन आपल्यानंतर तिने फटफटत पुढे नेलं आणि डोक्यानं मारू लागली. तिथल्या स्थानिकांना मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. म्हशीनं केलेल्या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील संभल इथल्या कोतवाली क्षेत्रातील असल्याचं सांगितलं जात आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी सुंदरबन इथे दोन बैलांच्या झुंजीमध्ये दोन बाईकचालक सापडले. सुदैवानं त्यांना गंभीर दुखापत झाली नाही मात्र त्यांनी बाजारपेठेत धुमाकूळ घातला आणि गाड्यांचं नुकसान केलं. या म्हशीनं देखील गाड्यांचं नुकसानं केलं मात्र बाईकस्वारालाही मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.