• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मेट्रो जात असताना अचानक पूल कोसळला; 23 जणांचा मृत्यू, भयावह VIDEO आला समोर

मेट्रो जात असताना अचानक पूल कोसळला; 23 जणांचा मृत्यू, भयावह VIDEO आला समोर

जेव्हा संपूर्ण जग कोरोना महासाथीशी सामना करीत असताना हा भयंकर प्रकार घडला आहे.

 • Share this:
  मैक्सिको, 4 मे : मेक्सिकोमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. मेक्सिको सिटीमध्ये एका एलिवेटेड मेट्रो लाइन कोसळल्याने कमीत कमी 23 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा एलिवेटेड लाइनवरुन मेट्रो जात होती, तेव्हा हा अपघात झाला. मेट्रोचा पूल खाली रस्त्यावर कोसळला. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. स्थानिक मीडियाने प्रसारित सुरक्षा कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये ट्रेनची बोगी पुलाच्या खाली कोसळताना दिसत आहे. या अपघातात ट्रेनच्या काही भागाने नुकसान झाले आहे. मेक्सिको शहरातील मेअर क्लाऊडिया शिवबाऊन यांनी मीडियाला सांगितलं की, या अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तब्बल 70 जणं जखमी झाल्याची शक्यता आहे. हे ही वाचा-कोरोनामध्ये पैशांचा काहीच उपयोग नाही'; ब्रीजवरुन पैशांचा पाऊस, VIDEO VIRAL या अपघातानंतर अनेक कर्मचाऱ्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मात्र बचाव कार्य थांबविण्यात आलं आहे. जेव्हा संपूर्ण जग कोरोना महासाथीशी सामना करीत आहे, तेव्हा मेक्सिकोमध्ये हा प्रकार घडला. कोरोना महासाथीमुळे देशातील 2,17,000 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: