Home /News /viral /

लग्नाच्या 8 व्या दिवशी नवरीचं दुसरं लग्न; VIDEO पाहून नवरदेवासह कुटुंबीयही हैराण!

लग्नाच्या 8 व्या दिवशी नवरीचं दुसरं लग्न; VIDEO पाहून नवरदेवासह कुटुंबीयही हैराण!

हा व्हिडीओ पाहून अनेकांना बसला धक्का...

    जमुई, 16 डिसेंबर : बिहारमधील (Bihar News) जमुईमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एका नवरीने आपल्या लग्नाच्या 8 दिवसात प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न (Second Marriage) केलं. लग्नानंतर प्रेमी जोडप्याने आपल्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोडही (Video Viral on Social Media) केला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लग्नाच्या दोन दिवसात नवरी पळाली.. जमुई शहरातील कल्याण पूर कॉलनीत राहणारी शिवानी कुमारी हिचं लग्न 7 डिसेंबर रोजी झालं होतं. मात्र ती दुसऱ्या तरुणावर प्रेम करीत होती. मात्र तरीही कुटुंबाच्या दबावाखाली तिने हे लग्न केलं. सांगितलं जात आहे की, पतीने लग्नाच्या दोन दिवसातच तिला मारहाण सुरू केली होती. ही बाब शिवानीने आपल्या प्रियकराला फोनवर सांगितली. यानंतर तिचा प्रियकर सासरी पोहोचला आणि नवरीला पळून घेऊन गेला. (The brides second wedding on the 8th day of the wedding family shocked after watching VIDEO) नवरीने लग्नाच्या 8 दिवसात केलं दुसरं लग्न मिळालेल्या माहितीनुसार, नवरीने लग्नाच्या 8 व्या दिवशी आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊ मंदिरात लग्न केलं होतं. सोबतच दोघांनी विवाहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता, यामध्ये त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मदतीची मागणी केली होती. आम्ही स्वत:च्या मर्जीने लग्न करीत असून आपल्या कुटुंबीयाकडून धोका असल्याचं त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. याशिवाय सुरक्षेची मागणी केली होती. हे ही वाचा-अचानक आलेल्या पतीला पाहून बॉयफ्रेंडला लटकवलं बाल्कनीत, हात सुटून झाला मृत्यू 10 वर्षांपासून सुरू होतं प्रेम प्रकरण... तरुणीने पोलिसांना सांगितलं की, गेल्या 10 वर्षांपासून ती उत्तम कुमार नावाच्या तरुणावर प्रेम करते. ती त्याच्यासोबतच लग्न करू इच्छितहोती. मात्र कुटुंबीयांना याबद्दल कळताच त्यांनी मला घराबाहेर जाऊ दिलं नाही. याशिवाय त्यांनी जबरदस्तीने माझं दुसरीकडे लग्न लावून दिलं. तो तरुण तिला मारहाण केल्याचंही तरुणीने सांगितलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Love, Marriage

    पुढील बातम्या