मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सनरूफ कारमधून नवरीची रॉकिंग एन्ट्री; बिचाऱ्या नवरदेवाचा मात्र पायी प्रवास, VIDEO VIRAL

सनरूफ कारमधून नवरीची रॉकिंग एन्ट्री; बिचाऱ्या नवरदेवाचा मात्र पायी प्रवास, VIDEO VIRAL

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक तरुणी स्वत:च्या लग्नात प्लान करण्याच्या तयारीत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक तरुणी स्वत:च्या लग्नात प्लान करण्याच्या तयारीत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक तरुणी स्वत:च्या लग्नात प्लान करण्याच्या तयारीत आहेत.

  नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : Wedding Video: सोशल मीडियावर (Social Media) तुम्ही आतापर्यंत नवरा-नवरीच्या एन्ट्रीचे अनेक व्हिडीओ (Entry Video) पाहिले असतील. अशा प्रकारचे व्हिडीओ नेटकऱ्यांकडून पसंतही केले जातात. मात्र वेळेनुसार नवरा-नवरीच्या एन्ट्रीमध्ये बराच बदल आल्याचं (Bride Groom Entry Video) पाहायला मिळत आहे. कधी नवरी घोडीवर येते, तर कधी नवरा-नवरी नाचत (Bride Groom Dance) येतात तर कधी कधी एन्ट्री सर्वांच्याच आठवणीत राहावी यासाठी नवनव्या क्लृप्त्या लढवल्या जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video). सनरूफ कारमधून नवरीची धमाकेदार एन्ट्री सध्या सनरूफ गाड्या (Sunroof Car) बऱ्याच ट्रेंडमध्ये आहेत. यामध्ये कारच्या वरच्या बाजूला खिडकी असते. जी वातावरण चांगलं असलं की उघडली जाते. ही नवरी अशाच एका कारमधून एन्ट्री घेत आहे. तिच्या दोन्ही हातात रंगांच्या पिचकाऱ्या आहेत. ती सनरूफवर स्वॅगमध्ये उभी आहे. आणि रंगाची उधळण करीत आहे. ही नवरी वेडिंग वेन्यूपर्यंत या कारने येत आहे. त्याशिवाय बिचारा नवरदेव मात्र गाडीच्या शेजारून चालत येत आहे. काळा चश्मा लावलेल्या या नवरीचा स्वॅग पाहून पाहुणे मंडळीदेखील याचीच चर्चा करीत आहे. या नवरी-नवरदेवाची जोडी लोकांना खूप आवडली आहे.
  लोकांना आवडली स्टाईल हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत 2 लाख 44 हजार वेळा पाहिला गेला आहे. सर्वांनाच नवरीची रॉकिंग एन्ट्री (Bride Entry Video) खूप आवडली आहे. कमेंटमध्येही लोक आपल्या लग्नात अशीच एन्ट्री करण्याचा प्लान करीत आहेत.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Marriage, Video viral, Viral video on social media

  पुढील बातम्या