Home /News /viral /

लग्न मंडपात या एका गोष्टीमुळे वैतागली नवरी; दिलेलं वचन पूर्ण करीत मदतीसाठी उभा राहिला नवरदेव

लग्न मंडपात या एका गोष्टीमुळे वैतागली नवरी; दिलेलं वचन पूर्ण करीत मदतीसाठी उभा राहिला नवरदेव

Wedding Video: फक्त तोंडी वचन घेणं पुरेसं नसतं, ते प्रत्यक्षात अमलात आणणं गरजेचं असतं.

  नवी दिल्ली, 5 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) नवरदेव-नवरीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ (Bride Groom Video) व्हायरल होत असतात. लग्नादरम्यान घडणाऱ्या विविध गोष्टी, वाद, डान्सबरोबरच लग्नातील (Wedding Video) छोटी-मोठी बाब देखील सोशल मीडियावर (Social Media) आवडीने पाहिली जाते. नुकताच नवरदेव आणि नवरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओसह प्रत्येक नवरी स्वत:ला रिलेट करू शकेल. लग्नात येतात या अडचणी लग्न किंवा सणाच्या दिवशी महिलांना ज्वेलरी (Bride Jewellery) घालायला आवडते. मात्र सर्वांनाच याची सवय नसते. मात्र लग्नाच्या दिवशी हे सर्व घालावं लागल्या कारणाने अनेक अडचणींना सामना करावा लागतो. सोशल मीडिया (Social Media) साइट इन्स्टाग्रामवर (Instagram) नवरा-नवरीचा एक व्हिडीओ व्हायरल (Bride Groom Video) होत आहे. ज्यामध्ये नवरी हातात घातलेल्या कलीरोंमुळे त्रस्त आहे. पंजाबी लग्नांमध्ये लग्नांमध्ये हा विधी केला जातो. अनेक हिंदी चित्रपटांमध्येही लग्नादरम्यान हा विधी आवर्जुन दाखवला जातो. हे ही वाचा-Watch Video: लग्नाच्या दिवशीच मुलीच्या वडिलांनी जावयाला दाखवला दंडूका
  सध्या तर अनेक लग्नांमध्ये अशा प्रकारचे (Fashion Trend) दागिने घालण्याची फॅशन आहे. या व्हिडीओमध्येही नवऱ्यामुलीने कलीरे नावाचा दागिना हातात घातला आहे. मात्र हा दागिना तिच्या घागऱ्यामध्ये अडकत असल्याचं दिसत आहे. यामुळे नवरी खूप वैतागल्याचं दिसत आहे. नवरदेव आला मदतीसाठी नवरदेवाने आपल्या नवरीला (Bride Groom Video) वैतागलेलं पाहिल्यानंतर तातडीने तिच्या मदतीसाठी पुढे आला. लेहंग्यात अडकलेले कलीरे काढण्याचा प्रयत्न करू लागला. लग्नात विधींदरम्यान शपथ घेण्यापेक्षा अशा प्रकारचं कृत्य अधिक बोलकं असल्याची प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Marriage, Viral video on social media

  पुढील बातम्या