मराठी बातम्या /बातम्या /Viral /6 वर्षांपूर्वीचा प्रियकरच निघाला बॉस; तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार, नेमकं काय झालं?

6 वर्षांपूर्वीचा प्रियकरच निघाला बॉस; तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार, नेमकं काय झालं?

कपल

कपल

प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाची खास अशी जागा असते. प्रत्येकाची प्रेमाची वेगळी अशी व्याख्या असते. दोन व्यक्ती, दोन वेगळे विचार, राहणीमान, अशा सर्वच गोष्टी प्रेमामध्ये एकत्र येतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 25 मार्च : प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाची खास अशी जागा असते. प्रत्येकाची प्रेमाची वेगळी अशी व्याख्या असते. दोन व्यक्ती, दोन वेगळे विचार, राहणीमान, अशा सर्वच गोष्टी प्रेमामध्ये एकत्र येतात. दोन व्यक्ती एकत्र येत एकमेकांचं सुख दुःख शेअर करतात. मात्र अनेकवेळा दोघांमध्ये मतभेदही होतात आणि नात्याचा शेवट होतो. त्यानंतरही ते योगायोगाने भेटले तर अनेक विचित्र प्रकार घडतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलाय.

एका तरुणीसोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. तिचा जुना प्रियकरच तिचा नवा बॉस निघाला असल्याचं प्रकरण समोर आलंय. सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा रंगलीये. अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या रायली जोएटने तिच्यासोबत घडलेली खरी आयुष्याची कहाणी शेअर केलीये.

हेही वाचा -   मोबाईलच्या नादात व्यक्तीसोबत घडला विचित्र प्रकार, पूल साईड Video समोर

या मुलीने तिची कहाणी सोशल मीडिया साइट टिकटॉकवर शेअर केली. तिने सांगितले की जेव्हा ती 19 वर्षांची होती तेव्हा तिची एका व्यक्तीशी भेट झाली होती. दोघेही 6 वर्षांपूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. पण मुलगा खूप सीरिअस झाला होता. या नात्याबद्दल तो खूप सीरिअस होता पण मुलीला फक्त टाईमपास करायचा होता. अशा स्थितीत अचानक एके दिवशी मुलीने त्याला ब्लॉक केलं आणि सर्व संपर्क तोडून टाकले.

तरुणीने ही गोष्ट टिकटॉकवर शेअर करताच तिला लाखो व्ह्यूज मिळाले. आता सहा वर्षांनंतर, 25 वर्षांच्या जोएटने न्यूयॉर्क पोस्टला सांगितले की तिने तिच्या प्रेमात जे पाप केले होते त्याची शिक्षा कदाचित आज तिला त्याच मुलाकडे नोकरीसाठी जाऊन मिळाली आहे. मुलीला नोकरीची नितांत गरज होती. जरी, मुलाखती दरम्यान, मुलाने देखील मुलीला ओळखले, परंतु त्याने कोणत्याही प्रकारचा बदला घेतला नाही. मात्र जोएटने ऑफर नाकारली कारण तिला चांगल्या पगारासह इतरत्र नोकरी मिळाली. पण दोघांचा हा किस्सा चांगलाच व्हायरल झाला.

दरम्यान, प्रेमाचे असे अनेक भन्नाट किस्से सोशल मीडियावर कायमच चर्चेत येत असतात. यापूर्वीही असे अनेक किस्से व्हायरल झाले आहेत.

First published:
top videos

    Tags: Love, Love story, Social media viral, Top trending, Viral, Viral news