वीरपुर, 21 डिसेंबर : मराठीमध्ये काळ आला होता पण वेळ आली नव्हती...अशी म्हण आहे. अनेकवेळा गंभीर अपघात होऊनही किंवा इमारत कोसळूनही कित्येकजण सुखरुप यातून बचावतात. अशावेळी ती व्यक्ती वाचली याबाबात दिलासा वाटत असतो. सध्या ठिकठिकाणी लावलेले सीसीटीव्ही आणि मोबाइल उपलब्ध असल्याने असे अनेक क्षण टिपले जातात.
वीरपूरमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद झाली आहे. ही घटना सकाळच्या वेळेत घडल्याचा अंदाज आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक लहान मुलगा दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला. तो रस्त्यावरुन दूध आणण्यासाठी मजेत, उड्या मारत जाताना दिसतो. दरम्यान मध्ये एक रिक्षा भरधाव वेगाने जाताना दिसते. रिक्षाने या मुलाला जोरदार टक्कर दिली. यानंतर तो मुलगा रिक्षासोबत रस्त्यावर फरफटत गेला. मात्र या अपघातात मुलाला थोडंसं खरचटलं आहे.
भरधाव रिक्षेच्या धडकेत रस्त्यावर लांबपर्यंत फरफटत गेला मुलगा; Video पाहून म्हणाल...दैव बलवत्तर! pic.twitter.com/v84xObFnbl
ही घटना वीरपूरमधील जलाराम नगर येथील आहे. हा मुलगा दूध घेण्यासाठी रस्त्यावरुन जात असताना हा अपघात घडला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा अपघात इतका भयंकर होता की मुलाला जबर मार लागल्याचा संशय येतो. मात्र सुदैवाने या अपघातात मुलगा सुखरुप आहे.