कझाकिस्तान, 5 डिसेंबर : आतापर्यंत तुम्ही महिला-पुरुषांचं लग्न (Marriage) पाहिलं असेलच..सध्याच्या काळात दोन महिला किंवा दोन पुरुष आणि थर्ड जेंडरच्या लग्नाविषयीही ऐकलं असेल. मात्र तुम्ही कधी कोणता पुरुष आणि डॉलसोबत लग्न लावल्याचं ऐकलं आहे का? कदाचित तुम्ही हे ऐकलं नसेल, मात्र ही बाब खरी आहे. कझाकिस्तानमधील एका बॉडीबिल्डरने पूर्ण विधींसह एक बाहुली मार्गोशी लग्न केलं आहे. अनेक पाहुण्यांच्या उपस्थितीत यूरी टोलोचकोने डॉलसोबत लग्न केलं. यावेळी लग्नामध्ये पारंपरिक नृत्याच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. काय आहे हा प्रकार...
यूरीने आपल्या लग्नाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तो वराच्या पारंपरिक पोशाखात दिसत आहे. तो व्हिडीओमध्ये आपली सुंदर पत्नी मार्गोसोबत डान्स करीत असताना दिसत आहे. त्याने मार्गोला जवळ घेतलं आहे आणि दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. मार्गो ही त्याची सिंथेटिक सेक्स डॉल (Sec Doll) आहे. त्याने आपल्या लग्नाचं फुटेज शेअर करीत इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे की, सध्या हे असं आहे. हा आनंद भविष्यातही कायम राहिल.
यूरीची इन्स्टाग्रामवर दोन खाती आहेत आणि एकत्रितपणे सुमारे एक लाख चाळीस हजार फॉलोअर्स आहेत. युरीने मार्गोला रिंग घालून कुटुंबीयांसमोर किस करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. यूरी खूप आधीपासून या लग्नाची तयारी करीत होता. त्याचं मार्गोवर खूप प्रेम आहे. त्याच्यामते ती खूप सुंदर आहे.
View this post on Instagram
नाइट क्लबमध्ये पहिल्यांदा झाली भेट
यूरीच्या दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, कपल्सनी कमी बोलायला हवं. मात्र त्यांच्यामधील नातं घट्ट असायला हवं. मला मार्गोला समजून घ्यायला वेळ लागतो. मात्र शब्दांपेक्षाही आमच्यातील प्रेम अतूट असल्याने माझ्यासाठी हे सोपं आहे. यूरी आणि मार्गोची भेट एका नाइट क्लबमध्ये झाली होती.