बोट निघाली पण जेसीबीच समुद्रात बुडाला, वसईतला LIVE VIDEO

बोट निघाली पण जेसीबीच समुद्रात बुडाला, वसईतला LIVE VIDEO

आता या जेसीबीला समुद्रातून बाहेर काढण्यासाठी 2 जेसीबी आणले असून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

  • Share this:

वसई, 04 मे : कोणतीही मोठी दुर्घटना घडली की जेसीबीच्या (jcb machine) मदतीने बचावकार्य पार पाडले जात असते. पण, वसईच्या (Vasai) समुद्र किनाऱ्यावर अडकलेल्या बोटीला काढण्यासाठी प्रयत्न करत असताना जेसीबी मशीन बुडाली आहे.

वसईच्या समुद्र किनाऱ्यावर सोमवारी दुपारी ही घटना घडली. पाचूबंदर किनाऱ्यावर असणारी एक बोट अचानक किनाऱ्यावरून सुटली आणि ती वाहत वाहत खोल समुद्रात रानगाव आणि मर्सेसच्या दरम्यान समुद्रात अडकली.

किनाऱ्यालगतच बोट असल्यामुळे तीला काढण्यासाठी जेसीबी मशीन बोलवण्यात आली. अडकलेल्या बोटीला बाहेर काढण्यासाठी हा जेसीबी त्या ठिकाणी गेला. दोरखंड लावून बोटीला समुद्रात खेचले जात होते. बऱ्याच मेहनतीनंतर बोट ही समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचली. मात्र, अचानक समुद्राला भरती आल्याने जेसीबी किनाऱ्यावरच रुतला. पाण्याची पातळी वाढत गेल्यामुळे जेसीबी मशीन घटनास्थळावरच अडकून पडला.

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, वैद्यकीय अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

सुमुद्राचे पाणी वाढत असल्यामुळे वेळीच ड्रायव्हर सुखरूपपणे बाहेर आला.  अडकलेली बोट देखील बाहेर आहे. मात्र, आज जेसीबी अद्यापही पाण्यातच आहे. आता या जेसीबीला बाहेर काढण्यासाठी 2 जेसीबी आणले असून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Published by: sachin Salve
First published: May 4, 2021, 5:34 PM IST
Tags: वसई

ताज्या बातम्या