• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अरे बापरे! शेपटीसह जन्माला आलं बाळ, डॉक्टरही झाले हैराण

अरे बापरे! शेपटीसह जन्माला आलं बाळ, डॉक्टरही झाले हैराण

बाळाला परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

बाळाला परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

असं म्हणतात, की आपल्याला म्हणजे आपल्या पूर्वजांना पूर्वी शेपूट होतं. हे शेपूट कालांतराने गळून पडलं. तरीही आपल्या पूर्वजांना शेपूट होतं आणि त्याचा पुरावा अधूमधून आपल्याला मिळत राहतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : ब्राझीलमध्ये (Brazil) एका लहान बाळाचा जन्म झाला. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? जगभरात रोज लाखो मुलांचा जन्म होतो; पण या बाळाच्या जन्मानंतर डॉक्टरांसह सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे या बाळाला जन्मापासूनच शेपटी (Baby With Human Tail) आहे. विश्वास बसत नाही? पण हे खरं आहे. अर्थात डॉक्टरांच्या एका टीमनं ऑपरेशन करून ही शेपटी काढली. ‘आज तक’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. अर्थातच या बाळाबद्दल सगळीकडे चर्चा सुरू होती. नियोजित वेळआधीच जन्माला आलेलं हे बाळ थोडं अशक्तही होतं. जर्नल ऑफ पेडियाट्रिक सर्जरी केसमध्ये या बाळाच्या शस्त्रक्रियेची नोंद करण्यात आली आहे. तसंच या बाळाची शेपटी काढतानाच्या शस्त्रक्रियेचं चित्रीकरणही करण्यात आलं आहे. बार्झीलच्या अल्बर्ट साबिन चिल्ड्रन हॉस्पीटलमध्ये या बाळाचा जन्म झाल्याचं वृत्त ‘द मिरर’ दिलं आहे. हे ही वाचा-वन नाईट स्टँड SEX करणं बेतलं महिलेच्या जीवावर, थोडक्यात बचावली डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आईच्या गर्भात असताना प्रत्येक भ्रूणालाच शेपटी असते. भ्रूण जसजसा मोठा होत जातो, त्याला आकार येत जातो, तसतशी शेपटी नष्ट होते; मात्र काही अगदी अतिदुर्मळ केसेसमध्ये ही शेपटी जन्मानंतरही तशीच राहते. या बाळाबाबतही असंच झालं. ही शेपटी मांसाची होती आणि त्यात कोणतंही हाड नव्हतं. या बाळाच्या शेपटीची लांबी 4 इंच (10.6 सेंमी) इतकी वाढली होती. या शेपटीचं टोक क्रिकेटच्या बॉलसारखं गोल होतं. हे बघून डॉक्टर्सही थक्क झाले होते. आतापर्यंत हाड नसलेल्या शेपटीसह 40 बाळं जन्माला आल्याची नोंद आहे; मात्र ही शेपटी मज्जासंस्थेशी जोडली गेली नव्हती. त्यामुळे ती ऑपरेशन करून काढता येऊ शकली, असं सोनोग्राफीच्या वेळेस डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे ती काढण्यात आली. या बाळाचा जन्म नियोजित तारखेआधी झाला होता. बाळाची तब्येत व्यवस्थित आहे. अनेकदा लहान मुलं जन्माला येताना त्यांना काही व्यंग असू शकतं. वेळेवर लक्षात आलं तर त्यावर योग्य उपचार होऊ शकतात आणि पुढे होणारा त्रास कमी होऊ शकतो. असं म्हणतात, की आपल्याला म्हणजे आपल्या पूर्वजांना पूर्वी शेपूट होतं. हे शेपूट कालांतराने गळून पडलं. तरीही आपल्या पूर्वजांना शेपूट होतं आणि त्याचा पुरावा अधूमधून आपल्याला मिळत राहतो. आपण कोणीही शेपटीसह जन्माला येत नाही; पण नुकतंच या एका बाळाचा शेपटीसह जन्म झाला आणि त्यामुळेच पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. ब्राझीलचं हे बाळ आता एकदम निरोगी आहे. डॉक्टरांना देवदूत म्हटलं जातं आणि या बाळाच्या बाबतीत हे अगदी खरं ठरलं आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: