बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहे 'हा' प्राणी तुम्हाला ओळखता येईल का ही अ‍ॅक्शन?

बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहे 'हा' प्राणी तुम्हाला ओळखता येईल का ही अ‍ॅक्शन?

सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा मजेदार फोटो आणि व्हिडीओ शेअर होतात. सोशल मीडियावर शेअर होत आहे. एका प्राण्याचा हा फोटो असून तो फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या क्रिकेटपटूची आठवण येईल.

  • Share this:

मुंबई, 13 मार्च :  सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा मजेदार फोटो आणि व्हिडीओ शेअर होतात. त्यापैकी काही फोटो आणि व्हिडीओ पाहून तर आपण थक्क होतो. त्याला पाहून हसू आवरत नाही. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे. एका प्राण्याचा हा फोटो असून तो फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या क्रिकेटपटूची आठवण येईल.

IPS अधिकारी दिपांशू काबरा (IPS Dipanshu Kabra) यांनी हा फोटो शेअर केला आहे. बॉलिंग अ‍ॅक्शनची नक्कल करण्याचा प्रयत्न...? खेळाडूचं नाव सांगा असा प्रश्न त्यांनी ट्विट करत विचारला आहे. त्यांचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले आहे.

दिपांशू काबरा यांचे हे ट्वीट चांगलेच व्हायल झाले आहे. त्यांनी वेगवेगळ्या क्रिकेटपटूंच्या बॉलिंग अ‍ॅक्शनसह हा फोटो शेअर केला आहे. या फोटोने देखील सर्वांचे चांगले मनोरंजन होत आहे.

इरफान पठाण, मलिंगा, बुमराह आणि हरभजन सिंग यासारख्या खेळाडूंच्या बॉलिंग अ‍ॅक्शनची नक्कल असल्याचं मत युजर्सनी व्यक्त केले आहे. खेळाडूंच्या नावावर वेगवेगळी मतं असली तरी हा फोटो मनोरंजक आहे, यावर सर्वांचेच एकमत झाले आहे.

Published by: News18 Desk
First published: March 13, 2021, 11:15 AM IST

ताज्या बातम्या