Home /News /viral /

गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड नोंदवणाऱ्या 90 वर्षांच्या या 'गेमर आजींना' भेटलात का?

गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड नोंदवणाऱ्या 90 वर्षांच्या या 'गेमर आजींना' भेटलात का?

90 वर्षांच्या आजींनी ऑनलाईन खेळून केला अनोखा रेकॉर्ड

    मुंबई, 22 मे: ऑनलाइन खेळ फक्त लहान मुलंच खेळतात आणि त्यातून आनंद मिळतो हा दावा 90 वर्षांच्या महिलेनं खोटा ठरवला आहे. जसं वय वाढतं तशा आवडी निवडी आणि आपली इच्छाशक्तीही कमी होत जाते. असेही काही लोक असतात जे शेवटच्या श्वासापर्यंत आपली आवड किंवा आनंद मिळणाऱ्या गोष्टी करत राहतात. एका महिलेनं वयाच्या 90 व्या वर्षी ऑनलाइन गेम खेळून नवा विक्रम केला आहे. ज्या वयात आजींनी देवाचा जप आणि नातवंडांना गोष्टी सांगायला हव्यात तिथे चक्क हातात रिमोट कंट्रोल घेऊन गेम्स खेळण्यात मशगुल असल्याचं पाहायला मिळत आहे. या 90 वर्षांच्या महिलेनं गिनीज बुकमध्ये नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. 90 वर्षांच्या या आजींचं नाव आहे हमाको मोरी. यांना जगभरात गेमर आजी म्हणून ओळखळ आहे. 2015 रोजी त्यांनी एक युट्यूब चॅनल सुरू केलं. या चॅनलनं जवळपास 2, 50, 000 सब्सक्रायबर्सचा टप्पा गाठला आहे. एका महिन्यात त्यांनी 4 व्हिडीओ पोस्ट केले होते. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा वयाच्या 39 वर्षी गेम खेळण्यास सुरुवात केली होती. सध्या सर्वात वयस्कर गेमर म्हणून त्यांची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. गेमर आजींची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या