Home /News /viral /

58 सेकंदाच्या VIDEO तून जगण्याची नवी आशा मिळेल; 4 वर्षांच्या चिमुरडीच्या धैर्याला सलाम!

58 सेकंदाच्या VIDEO तून जगण्याची नवी आशा मिळेल; 4 वर्षांच्या चिमुरडीच्या धैर्याला सलाम!

कृत्रिम पाय बसवलेली ही मुलगी खंदकावर चढण्यासाठी किती संघर्ष करतेय ते या व्हायरल क्लिपमधून (Viral Clip) दिसते.

    नवी दिल्ली, 29 मे : सध्या कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होत आहे. आपल्या सभोवतालचे वास्तव खूपच निराशाजनक आहे. त्यामुळे अनेक लोक सध्या आशादायी गोष्टींचा शोध घेताना दिसत आहेत. यात सर्वांत आशादायी ठरते ती 4 वर्षांच्या अॅन्टोनेलाची (Antonella) कहाणी. या अॅन्टोनेलाचा इंटरनेटवर व्हायरल झालेला व्हिडीओ (Viral Video) सध्या लाखो लोकांची मनं जिंकत आहे. कृत्रिम पाय बसवलेली ही मुलगी खंदकावर चढण्यासाठी किती संघर्ष करतेय ते या व्हायरल क्लिपमधून (Viral Clip) दिसते. या लहान मुलीचं हे कृत्य अत्यंत प्रेरणादायी आहे. अॅन्टोनेला तिच्या आईला खंदकाबाहेर येण्यासाठी आधाराकरिता हात मागते. परंतु, तिची आई तिला तू स्वतःच बाहेर हे सांगत प्रोत्साहित करताना दिसते. या संवादाने या व्हिडीओची सुरुवात होते. अॅन्टोनेलाची आई तिच्याशी पोर्तुगीज (Portuguese) भाषेत संवाद साधत तु हे करु शकते, मला ठाऊक आहे, असे सांगताना व्हिडीओत दिसते. तुझा गुलाबी रंगाचा कृत्रिम पाय योग्यरितीने जोडला गेला आहे, तु पडणार नाही, अशी खात्री तिची आई तिला सातत्याने देत असल्याने ही चिमुरडी वारंवार चालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व्हिडीओत दिसते. या प्रयत्नांदरम्यान अॅन्टोनेला किमान 5 वेळा घसरते. अखेरीस अॅन्टोनेला यशस्वीरित्या खंदकावर येते, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरत नाही. ती मोठ्याने ओरडत आपला आनंद व्यक्त करते. ती आपल्या आईला थम्बस अप करते तेव्हा विजयाचे हास्य तिच्या चेहऱ्यावर नकळत झळकताना व्हिडीओत दिसते. या मुलीच्या धैर्याचा कस पाहणारा हा प्रसंग पाहून नेटिझन्सच्या (Netizens) डोळ्यात अश्रू तरळतात. हा व्हिडीओ जानेवारीत इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट करण्यात आला होता. मात्र व्टिटरवर (Twitter) हा व्हिडीओ नुकताच पोस्ट करण्यात आला आहे. एका व्टिटर युजर अॅन्टोनेलाच्या आईचे विशेष कौतुक करतो. तो म्हणतो की अॅन्टोनेलास त्वरित न चालवता तिच्या इच्छाशक्तीचा पूर्ण कस यात लागताना दिसतो. अॅन्टोनेलाचे स्मित हास्य तिच्या आईने केलेल्या प्रयत्नांचे सार्थक ठरते, असे देखील हा युजर म्हणतो. हे आपण करु शकू अशी खात्री अॅन्टोनेलास नव्हती, परंतु, तिच्या आईने प्रोत्साहन दिल्याने ती या प्रयत्नात यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरने दिली आहे. हे ही वाचा-VIDEO : कोरोनामध्ये क्रिएटिव्हीटीने गाठला नवा स्तर, देशी जुगाडचा भारी नमुना हा व्हिडीओ पाहताना मला खूप रडू येत होतं, तुम्हालाही ना ? असा सवाल एका युजरने व्टिट करुन विचारला आहे. या मुलीने जगाला प्रेरणा आणि शूरतेचे यथार्थ दर्शन घडवल्याचे आणखी एका युजरने व्टिट केले आहे. अॅन्टोनेलाची इन्स्टाग्राम प्रोफाइल तिचे पालक हॅण्डल करतात. तिला लेफ्ट लोअर एजिनेसिस (Left Leg Agenesis) हा आजार आहे. जेव्हा आईच्या गर्भात मुल वाढीच्या काळात एखादा अवयव विकसित होत नाही, तेव्हा हा आजार होतो. अॅन्टोनेलाचे पालक तिची सुंदर छायाचित्र अनेकदा इन्स्टाग्रामवरुन शेअर करीत असतात. सध्या तिचे 13 हजार फॉलोअर्स आहेत.
    First published:

    Tags: Positive story, Viral video.

    पुढील बातम्या