वेल्स, 13 सप्टेंबर :
जर तुम्ही पाण्यात बुडत असताना (Drowned) तुम्ही त्या वेळी काय कराल? मात्र वेल्सच्या समुद्रात 17 वर्षीय तरुण बुडत होता, मात्र अशा परिस्थितीत त्याने अशी हुशारी दाखवली की त्यामुळे त्याचा जीव वाचला. वेल्सच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा ऑडिओ आणि व्हिडीओ जारी केला आहे. व्हिडीओमध्ये बुडत असताना 17 वर्षीय तरुण मदत मागत होता.
मीडिया रिपोट्सनुसार 17 वर्षांचा मुलगा अल्फी ग्वेनेडच्या समुद्रात पॅंडलबोर्डिंग करत होता. तो 10 ऑगस्ट रोजी आपल्या बोर्डावरुन वेगळा झाला होता. मात्र अशा परिस्थितीत त्याने अशी हुशारी दाखविली की त्याने पॅंडलबोर्डवरुन पडण्यापूर्वी त्याने आपला मोबाइल फोन एका वॉटरप्रूभ पाऊचमध्ये टाकला होता. यामुळे त्याचा जीव वाचला.
हे ही वाचा-पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? दोन वेगवेगळ्या कोरोना रिपोर्टमुळे नागरिकांचं टेंशन वाढलं
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुणाने पाण्यात बुडत असताना मदत करण्यासाठी कॉल केला. यानंतर त्याचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येतं आणि त्याचा जीव वाचवला जातो. तरुण बुडत असताना ऑपरेटरला म्हणतोय की तो बुडत आहे. समुद्राच्या किनाऱ्यावरुन 400 मीटर दूर तो कोणत्या तरी भागात असल्याचे तो ऑपरेटरला सांगत आहे. ऑपरेटरने जेव्हा त्याला विचारलं की तो पॅडलबोर्ड वा जहाजात आहे? तर उत्तरात त्याने लिहिलं की, तो पॅडलबोर्डावर आहे मात्र आता बुडत आहे.
यानंतर ऑपरेटरकडून त्याला शांत राहण्याची व जागे राहण्याचा सल्ला दिला. यानंतर कोस्टगार्डने बचाव अभियान सुरू केला. त्याचा शोध घेण्यासाठी कोस्टागार्डने एक हेलिकॉप्टर पाठविला. बचाव दलाने त्याचा 40 मिनिटांपर्यंत शोध घेतला. आणि त्याला एअरलिफ्ट करीत रुग्णालयात आणण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral