थायलंड, 15 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) अनेकांच्या आयुष्यात उलथापालथ झाली आहे. जगातील कोट्यावधी लोकांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. बर्याच देशांची अर्थव्यवस्था कोलमडू लागली आहे, बॉलिवूड-हॉलिवूड इंडस्ट्रीवर परिणाम झाला आहे, आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, कोरोनामुळे माकडांमध्ये गँगवॉर झाल्याचा हा व्हिडीओ आहे. मध्य थायलंडमधील लोपबुरीच्या रस्त्यावर माकडांच्या दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये हे गँगवॉर झालं. रस्त्याच्या मध्यभागी शेकडो माकडे आपापसात भांडण करत असल्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला. यावेळी लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.
(हे वाचा-Coronavirus चं जगभरात थैमान आणि दीपिका घरी बसून काय करतेय पाहा)
आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोरोना व्हायरसचा आणि माकडांच्या गँगवॉरचा काय संबंध असू शकेल. तर झालं की, व्हायरस पसरण्याच्या भीतीने लोकं माकडांच्या जवळ जाणं टाळत आहेत. त्यांना खायला घालणं टाळत आहेत. परिणामी या ठिकाणच्या माकडांना भूक लागल्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता होती. मात्र अचानक त्यांच्यापैकी कुणाला तरी अन्न मिळताच दोन प्रतिस्पर्धी टोळ्यांच्या माकडांमध्ये गँगवॉर सुरू झाले.
As per daily mail online “Hundreds of hungry monkeys swarm across Thai street as 'rival gangs' fight over food after tourists who normally feed them stay away because of coronavirus.” Have you seen this coming ‘gang wars’ among monkeys bcz of #CoronaVirus. pic.twitter.com/e9s4BdcDO5
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) March 13, 2020
हा व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFS) अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्या ठिकाणी आलेल्या एका पर्यटकाने हा व्हिडीओ शूट केला आहे. बँकॉक पोस्टच्या मते, माकडे सामान्यत: दोन वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये राहतात. एक टोळी मंदिराच्या माकडांची असून दुसरी टोळी शहरातील माकडांची आहे. रस्ता या दोन टोळ्यांना वेगळे करतो.
(हे वाचा-VIDEO : कोरोनाची भीती घालवण्यासाठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांना अशी दाखवली जादू)
कोरोना विषाणूमुळे थायलंड शहरात कोणतेही पर्यटक नाहीत, म्हणून तेथे माकडांना आहार देणारे लोक नाहीत आणि त्यामुळे ही माकडं आता भुकेली आहेत.