मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: मासे पकडण्यासाठी गळ टाकला, पण माशाबरोबर बाहेर असं काही आलं की तरुणाची उडाली भंबेरी

VIDEO: मासे पकडण्यासाठी गळ टाकला, पण माशाबरोबर बाहेर असं काही आलं की तरुणाची उडाली भंबेरी

मासेमारीला गेल्यानंतर गळाला माशाऐवजी काहीतरी भयंकर लागलं तर एखाद्याची काय अवस्था होईल? अशीच काहीशी अवस्था या तरुणाची झाली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

टेक्सास, 30 डिसेंबर: संपूर्ण जगभरात अनेक विचित्र घटना घडत असतात. काही ठिकाणी विचित्र व्यक्तींच्या वागणुकीचे किस्से घडत असतात तर काही ठिकाणी प्राण्यांच्या. विशेष म्हणजे या घटना सोशल मीडियावर व्हायरल होतात.अमेरिकेत देखील नुकताच असा किस्सा घडला असून याचा व्हिडीओ (Video Viral) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. यामध्ये एक व्यक्ती मासेमारीसाठी गेला असता त्याच्या गळाला माशाबरोबर एक अशी काही गोष्ट लागली जी पाहून त्याला धक्काच बसला. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहून थक्क व्हाल. अमेरिकेतील टेक्सासमधील (Texas) असून ह्युस्टनमधील या व्यक्तीला मासेमारीदरम्यान एक वेगळाच अनुभव आला. या व्यक्तीच्या मासे पकडण्याच्या गळाला माशाबरोबर भलामोठा साप देखील वर आला.

Sputnik news ने याबाबत वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार चेज मॅक्क्रे हॅरिस काउंटी नावाचा हा व्यक्ती लांग्हम क्रीक या ठिकाणी मासेमारीसाठी गेला होता. यावेळी त्याच्या गळाला माशाबरोबर साप आल्याचं या व्हिडीओमध्ये (Video Viral) दिसून येत आहे. यामध्ये हा साप गळाला लागलेल्या माशाला खाताना दिसत आहे.

या घटनेविषयी बोलताना चेज याने असे म्हटले की, मी हा गळ वर काढल्यानंतर माशाबरोबर साप देखील वर आला. मी चाकूच्या मदतीने या सापाला दूर करण्याचा  प्रयत्न केला. थोडा वेळ गेल्यानंतर सापाने माशाला न सोडल्याने साप आणि मासा वेगळा करण्यात यश आले.

हा व्हिडीओ साधारण वर्षभरापूर्वीचा आहे. पंरतू पुन्हा एकदा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 4.6 मिलियन Viewa मिळाले आहेत.

First published:

Tags: Shocking viral video, Viral videos